सावखेडा होळ जवळ ट्रक खाली चिरडून महिलेचा मृत्यू

सावखेडा होळ जवळ ट्रक खाली चिरडून
 महिलेचा मृत्यू

पारोळा Parola

तालुक्यातील सावखेडा होळ (Sawkheda Hol ) येथे कंटेनर ने मोटरसायकल चालकाला (motorcyclist) कट मारल्याने (hit by a container) मोटरसायकल वर मागे बसलेल्या ५२ वर्षीय महिलेचा (woman) कंटेनरच्या मागच्या चाकात (crushed) येऊन मृत्यू (died) झाला असल्याचे घटना घडली आहे.

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सावखेडा होळ गावानजीक असलेल्या उड्डाण पुलाजवळ तीन वाजेच्या सुमारास पारोळा कडून जळगाव कडे जाणारी बिना नंबरची जुपिटर मोटरसायकलवर संजय बाजीराव काटकर, रा. वरणगाव. ता, भुसावळ व यांच्या सासूबाई कौसाबाई भगवान शिरसाट, वय ५२, रा. पिंपळगाव., रेणुकाई, भोकरदन. जि. जालना हे आपल्या मोटर सायकलने भुसावळ येथे जात होते.

मागुन भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनर सी. जी .०४ एम क्यू ०९८१ ने मोटर सायकल चालकाच्या हाताला कट मारल्याने मागे बसलेल्या महिलेचा पडून मागील चाकात येऊन जागीच मृत्यू झाला.

रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी मयताचे शव पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले . याबाबत ट्रक चालक मोहम्मद इस्तेखार अब्दुल बारीक रा कोलकत्ता, (पश्चिम बंगाल) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com