सव्वा लाखांची गावठी दारु नष्ट

२३ ठिकाणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
सव्वा लाखांची गावठी दारु नष्ट

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या (Chalisgaon Rural Police Station) हद्दीत अवैधरित्या (Illegally) सुरु असलेल्या दारुभट्टीवर (brewery) पोलिसांनी धाड (Police raid) टाकूण तब्बल २ लाख ११ हजार ५३० रुपयांची दारु, कच्चे रसायन नष्ट (Alcohol, raw chemicals destroyed) केले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात वेगवेगळे २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, सपोनि.धरमसिंग सुंदरडे, सपोनि. हर्षा जाधव, पोउपनि. लोकेश पवार आदिच्या पथकाने वाघळी, लोणजे, गणेशपूर, हिरापूर परिसरात गणेशोत्सवाच्या काळात अवैधरित्या सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर छापे टाकूले.

मागील २३ ठिकाणी दारुच्या भट्ट्यांवर छापे टाकूण २ लाख ११ हजार ५३० रुपये किमती दारु, कच्चे रसायन नष्ट केले आहे. तसेच पत्ता व मटका जुगारावर छापे टाकूण ८ गुन्हे दाखल करुन, त्यात २२ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com