भरधाव ट्रकच्या धडकेत भाजीपाला विक्रेता ठार

अजिंठा चौफुलीजवळील घटना; ट्रकचालक पसार
भरधाव ट्रकच्या धडकेत भाजीपाला विक्रेता ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भाजीपाला ()vegetablesघेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) हातगाडी गाडी ढकलत जात असलेल्या भाजीपाला विक्रेत्याला (vegetable seller) भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (speeding truck)जोरदार धडक (hit hard) दिली. या अपघातात राजेंद्र रुपसिंग पाटील (वय-40, रा. लक्ष्मीनगर, सिंधी कॉलनी) यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळ घडली. धडक देवून ट्रकचालक घटनास्थळाहून पसार झाला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जवखेडा येथील राजेंद्र पाटील हे दोन वर्षांपासून शहरातील लक्ष्मीनगरात कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, शहरात भाजीपाला विक्री करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास राजेंद्र पाटील हे हातगाडी घेवून भाजीपाला खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निघाले. महामार्गावरुन जात असतांना अजिंठा चौफुलीजवळ मागून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात राजेंद्र पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये त्यांच्या हातगाडीचे देखील नुकसान झाले आहे. तसेच धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने घटनास्थळहून पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भाजीपाला घेणार्‍यांनी मयताची पटविली ओळख

पहाटेच्या सुमारास काही विक्रेते भाजीपाला घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जात होते. तेव्हा त्यांन रस्त्यावर पडेलला राजेंद्र पाटील यांचा मृतदेह दिसून आला. विक्रेत्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी मृतदेह ओळखला. काही वेळानंतर एमआयडीसी पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घे मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

अपघातात राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात सकाळपासून गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com