स्वर, सुरांनी दिवाळी पहाटेचं अनोखं स्वागत

परिवर्तनच्या कलावंतांनी गाजवली दिवाळी पहाट
स्वर, सुरांनी दिवाळी पहाटेचं अनोखं स्वागत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दिवाळी सणाच्या (Diwali festival) पहाटेला भाऊच्या उद्यानात (brother's park) सोमवारी सकाळी रसीकांना आठ भाषातील (eight languages) सुरील गाण्यांची मेजवाणी (Melodic songs)मिळाली. भाषा, धर्म, पंथ, जात या पलीकडे जाऊन सुराना कोणत्याही भाषेचं बंधन नसते हे या दिवाळी पहाट कार्यक्रमातून दिसून आले. हवेतील गारठा आणि वाद्यांच्या तालावर रसिक मंत्रमुग्ध झाले होते.

संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तनतर्फे भाऊंच्या उद्यानात दिवाळीची पहाट कार्यक्रम झाला. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, भरत अळमकर, डॉ राहुल महाजन, नंदू अडवाणी, विजय काबरा, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिवे लावून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

परिवर्तनच्या कलावंतांनी राजस्थानी, अहिराणी, मल्याळम, तमिळ यासह आठ भाषांतील गाणी सादर केली. गायिका ऐश्वर्या परदेशी, प्रशांत साळुंखे, हर्षदा कोल्हटकर यांनी उठी उठी गोपाला, पांडुरंग नामी, बाजे मुरलीया, हे सुरांनो चंद्र व्हा अशी अनेक गाणी गायली. प्रतिक्षा कल्पराज यांनी खानदेशातील वही हा प्रकार सादर केला.

साक्षी पाटील यांनी बंगाली गीत गायले. लोकगीत गायक बुद्धभूषण मोरे यांनी देवीचा गोंधळ सादर केला. दिवाळीचं महत्व आणि भारतीय परंपराविषयी सुंदर निवेदन रंगकर्मी मंजुषा भिडे यांनी केले. यावेळी कीबोर्डवर नितीन पाटील यांनी तबलयावर भूषण गुरव, संवादिनीवर भूषण खैरनार यांनी साथसंगत केली.

सांगीतिक मैफिलीचा समारोप जागृती भिडे, साक्षी माळी, हेतल पवार यांच्या नृत्याने झाला. प्रास्ताविक रंगकर्मी मंगेश कुलकर्णी यांनी केले. माजी महापौर भारती सोनवणे, कैलास सोनवणे, विनोद देशमुख, अश्विनी देशमुख, अनंत जोशी, डा.ॅ राधेश्याम चौधरी, प्राचार्य एस. एस. राणे, डा.ॅ शशिकांत गाजरे, डा.ॅ रेखा महाजन, डा.ॅ रवी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com