चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

चुंचाळे Chunchala प्रतिनिधी

यावल तालुक्यातील चुंचाळे येथील गुरु रघुनाथ बाबा (Guru Raghunath Baba) व शिष्य वासुदेव बाबा (disciple Vasudev Baba) हे एकाच दिवशी वैशाख शुध्द बारसला समाधिस्थान (Samadhi place) झाले या गुरु व शिष्य यांच्या पुण्यतिथी सोहळा (Punyatithi ceremony) शुक्रवारी दि.१३ रोजी चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा दरबार येथे होईल

श्री सुकनाथ बाबा हे श्री क्षेत्र काशी (Kshetra Kashi) येथुन चुंचाळे येथे आले येथे त्यांनी अखंड बारा वर्ष तप केेले म्हणून चुंचाळे हे गाव सुकनाथ बाबा यांची तपोभुमी (Tapobhumi) म्हणून ओळखली जाते तसेच त्याचे चिरंजिव रघुनाथ बाबा यांचा जन्म याच भुमीत झाला म्हणून हे गाव त्यांची जन्मभुमी म्हणून ओळखली जाते व वासुदेव बाबा यांची कर्मभुमी या नावाने हे गाव प्रसिद्ध आहे सातपुड्याच्या पायथ्याशी चुंचाळे या पावन नगरीत महाराष्ट्रासह गुजरात,एम.पी व परिसरातील गावामध्ये देखील यांचे शिष्यमंडळी आहे

याच पिता पुत्राच्या एकाच मंदीरात समाधीचे स्थान (Samadhi place) वर्डी ता.चोपडा येथे आहे सुकनाथ बाबा यांनी १९३५ मध्ये तर रघुनाथ बाबा १९७९ मध्ये वर्डी ता.चोपडा या गावात समाधिस्थ झाले त्यांचे शिष्य वासुदेव बाबा हे गुरु रघुनाथ बाबांन बरोबर १९८० मध्ये चुंचाळे येथे बालपण अवस्थेत घर शिरपुर सोडुन बाबाची आणि पुरातन असलेली समाधी यांची स्नान .पुजापाट .आरती .करीत मंदिरात भक्ती केली व वासुदेव बाबांनी गावकरी आणि शिष्यमंडळीच्या सहकार्याने गावात मंदिर बांधण्यास प्रारंभ केला आणि आज हे येवढे मोठे भले मंदिर उभारले. मंदिरात २१ किलो चांदीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सन २००० मध्ये करण्यात आली या मंदिराचा कळस (summit of the temple) ६१ फुट उंचीचा आहे

चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा
जाणून घ्या जैन तीर्थकरांच्या जीवनातील कल्याणकारी पंचकल्याणक

असा साजरा होतो अनोखा सोहळा -

वासुदेव बाबा हे नेहमी वैशाख शुध्द बारसला त्यांचे गुरु रघुनाथ बाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम करत होते तेव्हा ते भक्ताना सागायचे की मी समाधिस्त झाल्यावर सुद्धा माझ्या गुरुची पुण्यतिथी साजरी करीत जा पंरतु गावातील गावकरी व शिष्यगण तुम्ही जसे तुमच्या गुरुची पुण्यतिथी साजरी करतात तशिच आम्ही तुमचीही पुण्यतिथी साजरी करत जाऊ आपल्या गुरुची आपल्यानतरही पुण्यतिथी व्हावी म्हणूनच आपल्या गुरुच्या पुण्यतिथी दिवशीच वासुदेव बाबा समाधिस्थान झाले तर २००१ पासुन असा गुरु शिष्य पुण्यतिथीचा सोहळा होऊ लागला या सोहळ्यासाठी मध्यप्रदेश .गुजरात.कर्नाटक येथील भाविकांचा यात समावेश आहे

असा होईल कार्यक्रम -

पहाटे ५ ला मुर्तीचे स्नान व समाधी स्नान ६ ला मारुती अभिषेक दुपारी १२ ला महाआरती सायंकाळी ७ ला आरती सकाळी ८ ते रात्री पर्यंत आरतीवेळ सोडून भजन.भारुड सुरु राहतील दुपारी १ ते रात्रीपर्यंत महाप्रसादाचे वाटप होईल

भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ वासुदेव बाबा भक्तगण व भंजनी मंडळ आणि गावकरी मंडळीने केले आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com