हरीविठ्ठल नगरात घरासमोर उभी दुचाकी जळाली

आगीचे कारण अस्पष्ट ; ८ हजारांचे नुकसान
हरीविठ्ठल नगरात घरासमोर उभी दुचाकी जळाली

जळगाव - jalgaon

शहरातील हरीविठ्ठल नगरात घरासमोर उभ्या दुचाकीला अचानक आग लागुन दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आगीत दुचाकी जळुन ८ हजारांचे नुकसान झाले आहे.

शहरातील हरिविठ्ठल नगर येथे शिवाजी मुरलीधर बारी (वय-४८) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीपी ३८२३) क्रमांकाची दुचाकी आहे. २ नोव्हेंबर रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सर्व झोपलेले असतांना अंगणात उभ्या दुचाकीने अचानक पेट घेतला. या दुचाकीसह टायर फोरहेड स्विच व वायरिंग जळुन ८ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिवाजी बारी यांनी दिलेल्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com