शनिपेठेत दुमजली इमारत कोसळली

११ जण जखमी ; सुदैवाने जीवितहानी टळली
शनिपेठेत दुमजली इमारत कोसळली

जळगाव : jalgaon

शहरातील शनिपेठ परिसरात महापालिकेच्या १७ क्रमांकाच्या शाळेसमोर असणारी दोन मजली जुनी इमारत गुरुवारी पहाटे अचानक कोसळली. घटनेमध्ये सुमारे ११ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे (Fire department) अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी शशिकांत बारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत कार्य करत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com