रावेरात जिएसटी चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापारी प्रतिष्ठानची दोन दिवस कसून चौकशी

रावेरात जिएसटी चुकवेगिरीच्या संशयावरून व्यापारी प्रतिष्ठानची दोन दिवस कसून चौकशी

रावेर|प्रतिनिधी raver

येथील प्लायवूड व सिमेंट (Plywood and cement) विक्रेत्याने जिएसटी (gst) चुकवेगिरीच्या संशयाने जीएसटी विभागाने दोन दिवस कसून चौकशी केली आहे.यात काही महत्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहे.या घटनेने रावेरात खळबळ उडाली आहे.

येथील देवजीभाई शिवाजीभाई पटेल यांच्या प्लायवूड व हार्डवेअर या दुकानावर सोमवार व मंगळवारी जीएसटी पथककाने झाडाझडती घेतली.यात सिमेंट व प्लायवूड हार्डवेअर दुकानात जिएसटी संदर्भात कसून चौकशी केली आहे. जीएसटी निरीक्षक इंदायणी व अन्य चार अधिकारी यांचा पथकात समावेश होता. या ठिकाणाहून काही महत्वाचे कागदपत्रे पथकातील अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहे.या घटनेने रावेरात जीएसटी पथकाने केलेली कारवाई अनेक व्यापार्यांच्या उरात धडकी भरवून गेली आहे.

याबाबत सबंधित दुकानाचे संचालक देवजीभाई यांनी देशदूत शी बोलतांना सांगितले कि,जिएसटी पथक जीएसटी कर योग्य रीतीने भरला जात आहे का? मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असल्याच्या कारणाने जीएसटी तपासणीसाठी आले होते.कारवाई बाबत कोणतेही निर्देश दिलेले नाही

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com