
चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी
चाळीसगाव-धुळे महामार्गावरील (Chalisgaon-Dhule Highway) भोरस फाट्याजवळ एकमेकांना कट मारण्याच्या प्रयत्नात ट्रक ( Trucks) व आयसर गाडीचा अपघात झाला. यात कोबीने भरलेल्या ट्रक भर रस्त्यात उलटला आणि आडवा झाला. यामुळे गेल्या चार ते पाच तासांपासून वाहतुक पूर्णता; ठप्प झाली होती.
महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि ट्रकमधील जखमी चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर वाहतुक सुरुळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. जेसीपीने आल्यानतंर ट्रक रस्त्यावरुन बाजूला करण्यात आला असून आता वाहतुक सुरुळीत झाली आहे. मदत कार्यासाठी महमार्ग पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखील पोउपनि.भागवत पाटील, एपीआय रूपाली पाटील, एएसआय प्रताप पाटील, पोकॉ. सुनील पाटील ,अशोक चौधरी,पो.हा. योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे,पो.ना. जोशी, वसीम शेख पो.कॉ.धनंजय सोनवणे ईशांत तडवी आदिनी घटनास्थळी उपस्थित राहुन वाहतुक सुरुळीत केली.