दीपनगरात दोन टन कोळशासह ट्रॅक्टर ताब्यात

भुसावळ तालुका पोलिसांची कारवाई
दीपनगरात दोन टन कोळशासह ट्रॅक्टर ताब्यात

भुसावळ Bhusawal। प्रतिनिधी

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर (Thermal Power Station Deepnagar) बॉयलर उपयोगी (Boiler useful) दोन टन कोळसा (Coal) चोरी (stealth) मार्गाने वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरसह चालकास (Driver with tractor) मुद्देमालासह रंगेहाथ (Caught red-handed.) दि.22 रोजी पकडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपनगर बॉयलर उपयोगी कोळशाची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे गोपनीय माहिती भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ नंदकुमार सोनवणे, रमण सुरळकर, यासीन पिंजारी तसेच दोन पंचांना फोन करून हॉटेल तनारिकाजवळ मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानंतर पोलीस स्टाफ व पंच असे फेकरी गावातील बसस्टॅन्ड समोरील बोगद्याच्या आडोशाला थांबलेले असताना, ट्रॅक्टर क्रमांक एमएच 25 एच 426 भरधाव वेगाने येतांना दिसले.

पोलिसांची व पंचांची खात्री झाल्याने दि. 22 सप्टेंबर पहाटे 2.45 वाजता सदरचे ट्रॅक्टर थांबवून संशयित चालकास पंचासमक्ष त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने नाव सचिन उत्तम सुरवाडे (वय 40, राहणार झेड.टी.एस. फेकरी सावळेनगर भुसावळ) अशी माहिती सांगितली.

प्रसंगी ट्रॅक्टर चालकाच्या ताब्यातून 12 हजार रुपये किंमतीचा दीपनगर बॉयलर उपयोगी दोन टन कोळसा व 2 लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर जप्त केले असून कोळशाबाबत व ट्रॅक्टरच्या कागदपत्राबाबत अधिक विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व ट्रॅक्टरचे कागदपत्र नसल्याने पोलीस स्टाफ व पंचांनी कोळशाने भरलेले ट्रॅक्टर हे भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात लावून पंचनामा हेकॉ रमण सुरळकर यांनी केला.

वाहतुकीबाबतच्या मूळ कागदपत्रांसह पोलीस स्टेशनला हजर राहण्याची लेखी समज देऊन सुद्धा अद्यापपर्यंत मूळ कागदपत्रे जमा केलेली नाहीत. म्हणून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भा.दं.वि.कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशनचे पोनि विलास शेंडे करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com