अवैद्य लाकडाची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई
अवैद्य लाकडाची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

चाळीसगाव | प्रतिनिधी chalisgaon

तालुक्यातील वडाळा-वडाळी (Wadala-Wadali) गावाकडून अवैद्यरित्या वृक्षतोड करुन, त्याची चोरटी वाहतुक करताना, चाळीसगाव ग्रामीण (police) पोलीसानी ट्रॅक्टर पकडले आहे. हि करावाई दि,८ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील कारवाईसाठी वनविभाकला पत्र पाठवले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, पोना गोवर्धन बोरसे, पोना शांताराम पवार, पोना संदिप पाटील आदिचे पथक तालुक्यातील वाघळी शिवारात पेट्रोलींग करत असतांना, पो.नि.संजय ठेंगे याना गुप्त माहिती मिळाली.

त्या अनुषंगाने त्यांनी वाडाळा-वडाळी गावाकडून वाघळी गावाकडे अवैद्य लाकूड तोंड करुन, त्याची चोरटी वाहतुक करणारे ट्रॅक्टर( क्र. एमएमच,१९,बीजी-५३७२) वाघळी चौफुलीवर थांबविले. ट्रॅक्टरची तपासणी केली असता, त्यात अवैद्य तोडलेले निंबाचे लाकूड आढळुन आले. ट्रॅक्टर चालकास विचार पूस केली त्याने त्याचे नाव अलताफ अली नवाब रा.वाघळी असे सांगीतले. तसेच टॅ्रक्टर हे गुलाब बंडू शिरसाठ रा.वाघळी यांच्या मालकीचे असल्याचे सांगीतले. लाकूड तोडीचा व वाहतुकीचा परवाना नसल्याचेे देखील सांगीतले. पोलिसांनी ट्रॅक्टर चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा करुन, पुढील कारावाईसाठी वनपरिक्षेत्र आधिकारी यांना पत्र दिले आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसपासून चाळीसगाव परिसरात अवैद्यरित्या वृृक्षतोड होत आहे. परंतू वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com