PHOTO# ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ; दुचाकी चालक जागीच ठार

PHOTO# ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ;  दुचाकी चालक जागीच ठार

चोपडा chopda प्रतिनिधी


   लासुर परिसरात अवैध लिंबाची वृक्षतोड (Illegal cutting of lemon trees) करून ते ट्रॉलीत भरून रात्री लाईट बंद ट्रॅक्टर चालकाने (tractor driver) भरधाव वेगात (breakneck speed) रस्त्याच्या विरुद्ध साईडने (opposite side of the road) चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक (bike was hit hard) देऊन लाकडांचे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्यावर पलटी झाले. यावेळी झालेल्या भीषण अपघातात कृष्णापूर(ता.चोपडा) येथील ३५वर्षीय आदिवासी तरुण दुचाकी चालक (bike driver) जागीच ठार (Killed on the spot) झाला तर दुचाकीवरील मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर घडली.

PHOTO# ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ;  दुचाकी चालक जागीच ठार
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...
PHOTO# ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ;  दुचाकी चालक जागीच ठार
करपंल पान, देवा जळलं शिवार!

अपघातानंतर मयत झालेला व गंभीर जखमी तरुणांना नागरिकांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगावला हलविण्यात आले आहे.

      चोपडा तालुक्यातील लासुर परिसरात जिवंत लिंबाची अवैध वृक्षतोड करून संध्याकाळी ट्रॅक्टर क्रमांक-MH-18 N 4438 च्या ट्रॉलीत भरून  ट्रॅक्टरचे लाईट बंद असतांना देखील रस्त्यावर भरधाव वेगाने शहराकडे येत असतांना रस्त्याच्या विरुद्ध साईडने चालवून समोरून येणारी दुचाकी होंडा शाईने क्रमांक-MH-04GK- 6147 हिस जोरदार धडक देऊन अवैध लिंबाचे लाकुड भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला पलटी झाले.

यावेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक सुकलाल केना बारेला (३५) रा.कृष्णापूर (ता.चोपडा) हा आदिवासी तरुण जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासुर-चोपडा रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरावरील माजी नगरसेवक रमेश शिंदे यांच्या शेताच्या समोर घडली.

PHOTO# ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ;  दुचाकी चालक जागीच ठार
गारबर्डी वनजमिनीवरील ८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटवण्यात प्रशासनाला यश

घटनेनंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे अपघातात मयत झालेला तरुण व गंभीर जखमी तरुणाला नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी डॉक्टरांनी सुकलाल केना बारेला यास मृत घोषित केले.तर गंभीर जखमी तरुणास जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरू आहेत.

    या बाबत मयत तरुणाचा लहान भाऊ दिलीप केना बारेला (२७) रा.कृष्णापूर (ता.चोपडा)
याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनला दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुध्द भादवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७, मोटर व्हीकल ऍक्ट-१८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त ट्रॅक्टर जप्त केले आहे.तसेच पोलीस फरार ट्रॅक्टर चालकाचा व मालकाचा कसून शोध घेत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.जितेंद्र सोनवणे करीत आहेत.

    

शासनाचा वनविभाग व महसूल विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांचा आशीर्वाद व

भ्रष्टाचारामुळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून चोपडा तालुक्यात ऑक्सिजन देणाऱ्या डेरेदार लिंबाच्या वृक्षांची बेसुमार अवैध तोड सुरू आहे.विशेष म्हणजे लिंबाची अवैध वृक्षतोड करून त्याची मुदत संपलेल्या,विना नंबर व लाईट बंद असलेल्या ट्रॅक्टरद्वारे राजरोसपणे बेकायदा वाहतूक सुरू आहे.त्यात बऱ्याच चालकांकडे वाहन चालविण्या चा परवाना नसतो.त्यामुळे अपघातात निरपराध लोकांचा जीव जात आहे.परिवहन विभागाकडून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहनांची तात्काळ तपासणी करण्यात येऊन संबंधित वाहन मालकांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह नागरिकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com