सेवानिवृत्त कारकुनाची सव्वा दोन लाखाची रक्कम लंपास

चोरांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ; रावेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद
सेवानिवृत्त कारकुनाची सव्वा दोन लाखाची रक्कम लंपास

रावेर|प्रतिनिधी - Raver

येथील व्ही एस नाईक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्लार्क अशोक पाटील यांच्या ताब्यातील दोन लाख २० हजार रुपये रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. याबाबत रावेर पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर पिंजून काढले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,व्ही.एस.नाईक महाविद्यालयात असलेले अशोक पाटील सेवानिवृत्ती नंतर खाजगी व्यवसायिकाकडे रखवालदारी करत होते. आज बुधवारी दुपारी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या रावेर शाखेतून नातेवाईकांना पैसे देण्यासाठी २ लाख २० हजार रक्कम काढली होती.

त्यानंतर ते रूपम मॉलच्या बांधकामा ठिकाणी गेले, त्याच ठिकाणी ते रखवालदारी करतात, त्या इमारती बाहेर असलेल्या भाजीपाला विक्रेत्याजवळ बोलत असतांना, त्यांच्यावर पाळत ठेवत असलेल्या भामट्यानी संधीचा फायदा उचलून अशोक पाटील यांच्याजवळील रक्कम लंपास केली आहे.

याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मिळवल्या असून, तपास करत आहे. सपोनि शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील व कर्मचारी संशयितांना शोधत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com