धरणगावातील उपजिल्हा रूग्णालयाचा मार्ग मोकळा : ना.गुलाबराव पाटील

धरणगावातील उपजिल्हा रूग्णालयाचा मार्ग मोकळा : ना.गुलाबराव पाटील

धरणगाव - प्रतिनिधी Dharangaon

येथील नागरीकांची प्रदीर्घ काळापासून मागणी असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाची (Hospital) मागणी आता पूर्णत्वास येणार असल्याची घोषणा, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी केली.

या नियोजीत रूग्णालयासाठी बालकवि ठोंबरे यांच्या स्मारकाच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आली असून, या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे असे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. धरणगावात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवडा मोहिमेचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ना. पाटील यांनी विविध खात्यांचा आढावा घेऊन, अधिकार्‍यांना अचूक नियोजन करून कार्यान्वयनाचे निर्देश दिलेत.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आजपासून सुरू झालेल्या "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. या पंधरवड्यात १७ सप्टेंबर ते २ऑक्टोंबर पर्यंत विविध १४ सेवांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. यात अतिवृष्टीग्रस्तांना नवीन निकषानुसार मदत, पीएम. सन्मान योजनेच्या निधीचा लाभ; फेरफार नोंदीचा निपटारा, शिधापत्रिका वाटप, विवाह नोंदणी प्रमाणपत्र वाटप, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी, प्रलंबीत विद्युत जोडणी, विद्युत मीटर हस्तांतरणात नाव जोडणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ; वनहक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रांच्या वाटपाचा समावेश असल्याची माहिती ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

या जागेची अधिकार्‍यांनी तातडीने पाहणी करण्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिल्यावर संबंधित अधिकारी यांनी जागेची पाहणी केली. या बैठकीत लंपी आजाराच्या संसर्गाबाबत चर्चा करण्यात आली. तालुक्यातील ९० टक्के गुरांचे लसीकरण झाले असून, उर्वरित १० टक्के गुरांचे तातडीने लसीकरण करण्याचे निर्देश दिले. शहरातील पोलीस वसाहतीत नवीन इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना दिलेत.

तर, ११ कोटी रूपयांच्या रेस्ट हाऊसच्या कामाला लकवर सुरू होणार असल्याची माहिती दिली. याच कार्यक्रमात नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना ५० हजार रूपयांच्या अनुदानाचे पत्र ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमाला तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार सातपुते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस.जी. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील, सार्वजनीक बांधकाम खात्याचे उप अभियंता सी. डी. पाटील, शाखा अभियंता ए. टी माळी; एस.ए. सपकाळे, डॉ.मयूर जोशी, डॉ. एस.डी भालेराव, ग्रामीण पुाणी पुरवठा विभागाचे सुनील बोरकर, भूमि अभिलेखचे उपनिबंधक विजयकुमार देवरे, डी.एस. दुसाने, महावितरणचे सुनील रेवतकर, मनीष धोटे, तालुका कृषी के.एस. देसले, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, माजी नगरपालिका गटनेते पप्पू भावे, कैलास महाजन, भगवान महाजन, विजय महाजन, भाजपचे ऍड. संजय महाजन, कैलास माळी आसीफ पटेल, रवी कंखरे, महेश पाटील, प्रशांत देशमुख, फारूक पटेल आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जनार्दन पवार यांनी केले. तर आभार नायब तहसीलदार श्री सातपुते यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com