मित्राला सुधारण्याचा सल्ला देत विद्यार्थीनीने केली आत्महत्या

मित्राला सुधारण्याचा सल्ला देत विद्यार्थीनीने केली आत्महत्या

चाळीसगाव chalisgaon । प्रतिनिधी

शहरातील गवळीवाडा फुले कॉलनी येथील रहिवाशी निर्जला सोमनाथ विसपुते या 15 वर्षीय मुलीने (girl) काल सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास राहते घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत निर्जला ही गुडशेफर्ड इंग्लिश स्कुलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होती. निर्जलाचे वडील मुंबईला राहतात तर निर्जला ही आजीकडे शिक्षणासाठी आलेली होती. काल निर्जलाची आजी कामानिमित्त बाहेर गेलेली असतांना सदरची घटना घडली. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईड नोटमध्ये निर्जलाने आपल्या मित्राला तु पुन्हा भांडण करु नको, यापुढे चांगले आयुष्य जग असा सुधारण्याचा सल्ला दिल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com