विद्यापीठात बहिणाबाईंचा पुतळा उभारणार

विद्यापीठात बहिणाबाईंचा पुतळा उभारणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा (Statue) उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा करीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री (Guardian Minister) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली.

विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,(North Maharashtra University) जळगाव या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ना.पाटील बोलत होते.

यावेळी मंचावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन, संचालक धनराज माने, डॉ.अभय वाघ, राजीव मिश्रा,शालिनी इंगोले, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, प्रभारी कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे, विष्णू भंगाळे, दिलीप रामू पाटील यांच्या विभागातील अधिकारी तसेच विद्यापीठ प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन (Vice Chancellor P.E. Vayunandan) यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबद्दल मंत्री उदय सामंत यांचे अभिनंदन करुन अनेक प्रश्न यातून मार्गी लागत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील व प्रा.मधुलिका सोनवणे यांनी केले. विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर केले. प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल.शिंदे यांनी आभार मानले.

जुना बांभोरी पुलाच्या कामांसाठी

40 कोटींचा प्रस्ताव

विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या निधीतून एक कोटी रुपये दिले जातील. तसेच विद्यापीठातील पाणी व वाहतुकीचा प्रश्न सुटावा, यासाठी जुना बांभोरी पुलाचे (Old Bambori Bridge) बांधकाम करुन बंधारा कम पूल तयार केला जाण्यासाठी 40 कोटींचा प्रस्ताव बांधकाम मंत्री यांच्याकडे दिला असून त्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत

ना.सामंत यांचा संवाद

व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत (Management Council Members) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Higher and Technical Education Minister) उदय सामंत यांनी सकाळी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर ना उदय सामंत (Uday Samant) यांनी अधिसभागृहात प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून प्राचार्य एस.आर.जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा.अनिल पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, प्रा.एकनाथ नेहेते, महिलांच्यावतीने प्रा.मनीषा इंदाणी, विद्यार्थ्यांच्यावतीने दौड यांनी आपल्या समस्या मांडल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन

जिल्हा ग्रंथालय अधिकारी (District Library Officer) कार्यालय नूतन इमारतीचे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन, आ. शिरीष चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तक्रारदाराला पोलिसांकडून धक्काबुक्की

कोरोनाच्या महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु असताना एका महाविद्यालयाने शंभर टक्के फी (Fee) न भरणार्‍या पाल्यांना परीक्षेस बसू न देण्याची धमकी दिली. त्या महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्याचे पालक (guardian) जगदीश बिंद्राप्रसाद गुप्ता यांनी थेट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना उदय सामंत यांची व्यासपीठावर भेट घेऊन तक्रार केली.ना.सामंत यांनी आश्वासन देवूनही गुप्ता ऐकून घेत नसल्याने पोलिसांनी (police) त्यांना धक्काबुकी करीत स्टेजखाली उतरविले. मीडियाने त्या तक्रारदाराला विचारणा केल्यानंतर पोलिसांनी नरमाईजी भूमिका घेतली. दरम्यान, ना उदय सामंत यांचे भाषण संपताच महाराष्ट्र स्टुंडट्स युनियनचे शिष्टमंडळाने विद्यापीठ आणि महाविद्यालय निवडणुकावर प्रश्न उपस्थित केला. याबाबत ना.सामंत यांनी कार्यक्रम अद्यापी संपलेला नाही.असे म्हणत कार्यक्रम संपल्यानंतर प्रश्न उपस्थित करण्याची सूचना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com