हॉटेलात घुसली भरधाव स्विफ्टकार

बहुलखेड्यातील घटना, दोन गंभीर
हॉटेलात घुसली भरधाव स्विफ्टकार

सोयगाव, Soygaon

सोयगाव कडे जाणारी भरधाव स्विफ्ट कार (Speedy Swift car) थेट हॉटेलात शिरल्याने (entering the hotel) दोन जण गंभीर (Two people) जखमी (seriously injured) झाल्याची घटना शनिवारी बहुलखेडा बस स्थानकावर (Bahulkheda Bus Station) घडली या घटनेमुळे बहुलखेड्यात तणाव निर्माण झाला होता. दोघे गंभीर जखमींना जळगावच्या खासगी रुग्णालयात (Admitted to a private hospital) दाखल करण्यात आले आहे.

सोयगावकडे जाणारी भरधाव स्विफ्टकार बहुलखेडा बस स्थानकावर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये शिरल्याने त्यात हॉटेल व्यावसायिक महिला आशा जाधव(वय ४३) आणि हॉटेलमध्ये भजे खाण्यासाठी आलेली नऊ वर्षीय बालिका सखू राठोड हे दोन्ही गंभीर जखमी झाल्या.

त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेत आशा जाधव यांचे पायांना गंभीर दुखापत झालेली असून सखू राठोड या बालिकेच्या छातीला मार लागलेला आहे या घटनेमुळे बहुलखेडा गावात गोंधळ उडाला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com