भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का

भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना धक्का

भडगाव Bhadgaon

भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचा (Gram Panchayat Elections) निकाल (result) प्रस्थापितांना धक्का देणारा तर तरूणांना संधी देणारा लागला आहे. शिंदे गटाने 3 भाजपनेही 3 तर ठाकरे गटाने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व आल्याचा दावा केला आहे. विजयानंतर उमेदरवारांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात गुलाल उधळून जल्लोष केला.

 भडगाव तालुक्यात ६ ग्रामपंचायतीची निवडणुक होती. त्यात तालुक्यातील सर्वात मोठ्या कजगाव ग्रामपंचायतीसह निंभोरा, पथराड, आडळसे, कोळगाव व अंतुर्ली चा समावेश होता. सर्वच गावात काट्याची टक्कर पहायला मिळाली बहूतांश ग्रामपंचायतीत परीवर्तन झाले. तर तरूणांना मोठी संधी मिळाली. शिंदे गटाचा ३ तर भाजपाचही ३ वर दावा केला आहे.

तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतीवर बाळासाहेबाची शिवसेनेने आमची सत्ता आल्याचा दावा केला आहे. नवनिर्वाचित सरपंच रघुनाथ महाजन यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन सत्कार स्विकारला. ते बाळासाहेबाच्या सेनेचे तालुका  संघटक अनिल महाजन यांचे वडील आहे. तर भाजपा कार्यालयात त्याचां सत्कार झाला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. याशिवाय निंभोरा व आडळसे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने बाजी मारली. पथराड आणि अंतुर्ली ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे. कोळगाव ग्रामपंचायतीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने बाजी मारली आहे.

  कजगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार रघुनाथ विठ्ठल महाजन विजयी (२७४८) हे विजयी झाले त्यांनी दिनेश सुमेरसिंग पाटील यांंना (पराभूत १७४९), केला. अन्य पराभुत लालसिंग भगवान पाटील (३३),  वसुधा संजय महाले (१६९), नोटा (२१) एकुण झालेले मतदान ४७२०, विजयी उमेदवार पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक १:- समाधान ज्ञानेश्वर पवार (मते ५५५), सत्यभामा हिलाल चौधरी  (मते ५२२), वार्ड क्रमांक २:-अक्षय राजेन्द्र मालचे (मते ५१४ ), कविता चंद्रकात महाजन ( ४६४), वैशाली धर्मराज मिस्तरी (मते ५००), वार्ड क्रमांक ३:-शेख सफी शेख इस्माईल मन्यार (मते ५१६), पुंडलिक मधुकर सोनवणे (मते ५०७), पल्लवी दिनेश पाटील (मते ५५२), वार्ड क्रमांक ४:-मंगीलाल देवराम मोरे (५१२), सादिक शेख गणी मन्यार (मते ५०७), स्विटी दिनेश धाडीवाल (मते ५१२), वार्ड क्रमांक ५:-  शोभा नामदेव बोरसे (मते ४४५), अंजनाबाई भगवान सोनवणे (४४३), भिकुबाई चंद्रसिंग पाटील (बिनविरोध), वार्ड क्रमांक ६:-विजय वसंत गायकवाड (मते ५६७), सीताबाई काशिनाथ सोनवणे (मते ५०१), मंदाकिनी जयसिंग पाटील(मते ५७१) निवडणुक निर्णय अधिकारी दिलीप चिचोंरे, सहाय्यक म्हणून सुनिल पवार, प्रमोद पाखले यांनी काम पाहिले.

निंभोरा येथे सरपंच पदासाठी निर्मलाबाई प्रकाश पाटील (८९६), या विजयी झाल्या त्यांनी विद्यमान सरपंच यांच्या पत्नी वंदना दिलीप पाटील यांचा पराभव केला. त्यांना (६८३) मते मिळाली. तर 

पाटील सुनंदा रामचंद्र (६४), नोटाला (११) मते मिळाली. विजयी ग्रामपंचायत उमेदवार व उमेदवार मते पुढील प्रमाणे - वार्ड १) संजय बबन भोई (मते ४०१), सरलाबाई भीमराव बाविस्कर (मते ४०८), कोकिळा माधवराव पाटील (मते ४२५), वार्ड २:- बळवंत दयाराम पाटील (मते २९३), पुनम आनंदा गायकवाड (मते २७३), बेबाबाई बापुराव पाटील (मते ३०१), वार्ड ३:-विश्वास वामन पाटील (मते ३६६), सुपडू गोविंदा बाविस्कर(मते ३२०), भागाबाई माणिक पाटील (मते ३६५) निवडणुक निर्णय अधिकारी एम. जे.पाटील यानी काम पाहिले.

अंतुर्ली ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त संरपंच उषा भाईदास मोरे (विजयी ७५८), छाया संजय गायकवाड (पराभूत ४१७), विजयी उमेदवार पुढील प्रमाणे वार्ड क्रमांक १:- बालु छोटुुलाल मोरे (मते १९६) , पुष्पाबाई खंडेराव पैठणकर (मते २०५), यशवंत सुकदेव पाटील (बिनविरोध), वार्ड क्रमांक २:- मनोज प्रकाश पाटील (मते ४५०), ज्योतिबाई दिपक भिल( मते ३८९), धनश्री लक्ष्मण पाटील (मते ३५९), वार्ड क्रमांक ३:- प्रतिभा प्रविण पाटील (मते २१८), सखुबाई चंद्रभान बनकर (मते २०१), मनोज रामराव पाटील (बिनविरोध) निवडणुक निर्णय अधिकारी आय. बी. देशमुख 

 आडळसे ग्रामपंचायत लोकनियुक्त संरपंच सर्वसाधारण दिलीप शिवराम पाटील ( विजयी, मते ५६८) धनंजय खंडेराव पाटील (पराभूत, मते ३१९)

  विजयी ग्रामपंचायत सदस्य  पुढील प्रमाणे  

वार्ड क्रमांक १:- वाल्मिक विक्रम मोरे (मते २२२), गंगुबाई रामा भिल (मते २४२), वैशाली बालु पाटील (मते २१८), वार्ड क्रमांक २:- मालुबाई ज्ञानेश्वर कोळी (मते १२४), रेखाबाई कैलास पाटील (मते १२७ ), वार्ड क्रमांक ३:- केवळबाई विठ्ठल पाटील(मते २०८), सुनंदाबाई राजेंद्र पाटील ( मते२२३) निवडणुक निर्णय अधिकारी एन. बी बैरागी यानी काम पाहिले.

पथराड ग्रामपंचायत लोकनियुक्त संरपंच रविंद्र नगराज पाटील (विजयी, मते ६७१), भाऊसाहेब सूर्यभान पाटील (पराभूत मते ६३४), बापु गोपीचंद पाटील (मते२४), नोटा मते ७,  वार्ड क्रमांक १:-  प्रकाश बाबुलाल राठोड (मते ३९३), विमलबाई ज्ञानेश्वर थोरात (मते ३७४), बेबाबाई जयराम चव्हाण (मते ३९१), वार्ड क्रमांक २:- साहेबराव मुरलीधर पाटील (मते २०८), तेजस्विनी सचिन चव्हाण (मते २४०), वार्ड क्रमांक ३:- रवींद्र नागु चव्हाण  (मते २१८), आशाबाई संभाजी सोनवणे  (मते २०२) निवडणुक निर्णय अधिकारी अशोक खेडकर यानी काम पाहिले.

  कोळगाव ग्रामपंचायत लोकनियुक्त संरपंच अनुसूचित जमाती स्री- कविता अंकुश सोनवणे ( विजयी, मते ९६५),  रेखा सुनील बिऱ्हाडे (पराभूत, मते ९५४) यांचा ११ मतांनी पराभव केला. विजयी ग्रामपंचायत उमेदवार पुढील प्रमाणे - 

वार्ड १ :- रुपचंद अशोक महाजन (मते २५५) , माळी सुनंदा नाना (बिनविरोध), वार्ड २:-वंदना शिवदास भिल (मते ३६४), प्रमिला भगवान पाटील (मते ३१२), ) विनायक बळीराम माळी (बिनविरोध), वार्ड ३:- शुभम आत्माराम ठाकरे (मते २७६), ज्योती संदीप महाजन (मते २४५), शितल कपिल महाजन (बिनविरोध), वार्ड ४:-सीमा संदेश महाजन (मते २६०), विजय झिपरू केदार (बिनविरोध), रोहिदास रामदास पाटील (बिनविरोध)  निवडणुक निर्णय अधिकारी एन.जी.बांगड यांनी काम पाहिले.

निवडणूक निकाल बदोबस्तकामी ३ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार व १२ बाहेरील पोलीस असे एकुण ३७ पोलीस कर्मचारी, जळगाव येथिल १ पोलिस विशेष पथक ,२० होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी स्वप्नील चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com