महामार्गावर टायर फुटून उडालेेल्या ठिणगीने धावता ट्रक पेटला

शिवकॉलनी येथील घटना; दोन बंबांनी विझविली आग
महामार्गावर टायर फुटून उडालेेल्या ठिणगीने धावता ट्रक पेटला

जळगाव jalgaon

धुळे येथून बारदान घेवून जळगाव शहरात खाली करण्यासाठी आलेल्या ट्रकचे (truck) टायर (Tires) फुटून (Split) निघालेल्या ठिणगीमुळे चालत्या ट्रकला भीषण आग (Fierce fire) लागल्याची घटना आज रात्री ९ वाजेच्या सुमारास शिवकॉलनी रेल्वे उड्डाण पुलावर (Railway Flight Bridge) घडली. महापालिकेच्या दोन अग्निशमन बंबाने ही आग आटोक्यात आणली आहे.

धुळे येथून ट्रक क्रमांक (एमएच ०४ सीजी ७८१२ ) कृषि उत्पन्न बाजार समितीत लागणारे बारदान घेवून जळगाव शहरात आज रात्री ९ वाजेच्या सुमारास दाखल झाला. शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डान पुलावरून जात असतांना चालत्या ट्रकचे अचानक टायर फुटले. टिणगी उडाल्याने ट्रक मधील बारदानने आग लागली. ट्रकला आग लागल्याचे समजताच ट्रक चालकाने रस्त्यावरच ट्रक थांबविला.

यावेळी रस्त्यावर येणार्‍या जाणार्‍या नागरीकांनी देखील आपापली वाहने थांबवून आग आटोक्यात आण्यासाठी ट्रक मधील बारदान काढण्याचा प्रयत्न केला. परंतू काही वेळातच ट्रकने देखील पेट घेतला. दरम्यान, काही वेळातच महापलिकेच्या अग्निशमन पथाकाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली. महामार्गाच्या मधोमध घडलेल्या या प्रकारामुळे दोन्ही कडील वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहर पोलीस वाहतूक शाखेचे पथकाने घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com