सायकलचा कट लागल्याने वाहनांची तोडफोड

चार लाखांचे नूकसान, चाळीसगाव पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल
सायकलचा कट लागल्याने वाहनांची तोडफोड

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

रस्त्यावरुन जाणार्‍या (Motorcycle) मोटार सायकलला सायकलचा कट लागल्याने पाच जणांनी तलवार व कोयते घेवून एकाच्या राहत्या घरी हल्ला केला. व उभ्या असलेल्या गाडीची तोडफोट करुन तब्बल चार लाखांचे नूकसान केले आहे. हि घटना दि,२२ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चाळीसगाव (police) पोलीस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चारुदत्त नानाभाऊ पवार यांया मुलगा राम यांच्या (Bicycle) सायकलचा कट लागल्याच्या कारणावरुन सिद्धांत आण्णा कोळी, सौरभ आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही, तसेच नवरे, जाधव पूर्ण नाव माहित नाही व इतर दोन अनोळखी मुले यांनी दि, २२ रोजी जयशंकर नगर येथे चारुदत्त पवार यांच्या राहत्या घरी हातात लोखंडी तलावर, कोयते घेवून गेले व शिवीगाळ करुन, उभ्या असलेल्या कार, बुलेट, व दुचाकीची तोडफोट केली. यात सुमारे चार लाखांचे नूकसान झाले आहे.

याप्रकरणी (Chalisgaon Police Station) चाळीसगाव पोलीस स्टेशनला चारुदत्त पवार यांच्या फिर्यादीवरुन सिद्धांत आण्णा कोळी, सौरभ आण्णा कोळी, रोकडे पूर्ण नाव माहित नाही, तसेच नवरे, जाधव पूर्ण नाव माहित नाही व इतर दोन अनोळखी मुले यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हां दाखल झाला आहे. पुढील तपास सपानि संजय कापडणीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.