खिरोद्याजवळ नाल्यात रिक्षा उलटून एक ठार

खिरोद्याजवळ नाल्यात रिक्षा उलटून एक ठार

सावखेडा (Sawkheda) ता रावेर वार्ताहर

सावखेडा येथून सुमारे 12 की मी दूर असलेल्या खिरोदा - पाल रस्त्यावर (Khiroda - Pal road) पाल कडून खिरोदा मार्गे फैजपूर येथे जाणारी अँपे रिक्षा (Ampe Rickshaw) क्रमांक MH 19, CW, 0980 ही दि 9 रोजी सायंकाळी खिरोदा घाटा चे अगोदर भिलट बाबा मंदिराचे पुढे नाल्यात पलटी (overturned in a drain) झाल्याने एक जण ठार (one killed) तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सावदा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी रवाना झाले जखमीला तातडीने भुसावळ येथे उपचारा साठी रवाना करण्यात आले यात कपले नामक फैजपूर येथील व्यक्ती ठार मंडवाले नामक व्यक्ती जखमी झाली असल्याचे समजत आहे.

जे.सी. बी. च्या साह्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली, यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ जयराम खोडपे, पो,हे,कॉ युसूफ तडवी, मेहरबान तडवी, संजय तडवी, देवा पाटील यांनी तातडीने मदत केली. या प्रकरणी सावदा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com