बंद घरातून सव्वा लाखांचा मुद्मेमाल लंपास

चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
 बंद घरातून सव्वा लाखांचा मुद्मेमाल लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शहरातील करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरटयाने बंद घराचे दरवाज्याचे लॉक तोडून घरातील चॉंदीचे शिक्के व रोख रक्कम असा एकूण १ लाख २१ हजारर ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हि घटना दि,२९ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस (police) स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अनिल वामनराव विसपुते, वय ५४, धंदा लॅन्ड डेव्हलपर्स, रा. देवकर नगर, करगांव रोड, चाळीसगांव यांना चाळीसगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनूसार ते दि. २७/०६/२०१३ रोजी सकाळी ०८ वा.च्या सुमारास मुंबई येथे गेले होते. त्यानंतर संकाळी त्यांची पत्नी अनुपमा व मुलगा अनिकेत असे संकाळी ९ वाजेच्या सुमारास धुळे येथे गेलेे. जातांना ते घराच्या मुख्य दरवाज्यास कुलूप लावुन गेले होते. आज दि.२९/०६/२०१३ रोजी सकाळी ०७.३० वा. च्या सुमारास अनिल विसपुते हे चाळीसगांव येथे घरी आले. तेव्हा घराचे मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक व कडया तुटलेल्या परीस्थीतीत होत्या. दरवाजा उघडा होता त्यांनी आत जावुन पाहिले असता, घरातील दोन्ही बेडरुमचे दरवाज्याचे लॉक तोडलेले होते व बेडरुम मधील कपाटे उघडे होते. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरुमचे कपाटामध्ये असलेल्या सुटकेस मधील चांदीचे शिक्के व रोख रक्कम दिसुन आले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन घरामध्ये असलेले चांदीचे शिक्के व रोख रक्कम चोरी केली आहे. यात ९७ हजार २०० रुपये रोख व चॉंदी शिक्के, ताट, पॅन्डल असा एकूण १ लाख २१ हजारर ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अनिल वामनराव विसपुते यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आ.के.ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न

शहरातील गजनान महाराज मंदिरालगत असलेले राकेश कैलास मोरे यांचे आर.के. ज्वेलर्स शॉप हे देखील फोडण्याचा प्रयत्न झाला. परंतू शेजार्‍यांच्या जागृतेमुळे तो फसला. हे चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com