व्यक्तीचा जन्म दोन वेळा होतो : डॉ . भावेश भाटीया

व्यक्तीचा जन्म दोन वेळा होतो : डॉ . भावेश भाटीया

शेंदुर्णी,Shendurni ता. जामनेर

वर्गात नेहमी अंध (Blind) असल्यामुळे वेगळे बसविले जात असे त्यातूनच सृजनशिल मनाची जडण घडण (Creating a creative mind) झाली.समाजाने अंध म्हणून दूर सारल्यानंतर आईने त्यांना प्रेरणा दिली त्यातून त्यांनी बोध घेत लिम्का बुक रेकॉर्ड (Limca Book of Records)मध्ये स्वतःचे नाव कोरले. न थांबता कार्य केल्याने आज यशाच्या शिखरवर आहे. असे मत महाबळेश्वर येथील पॅराऑलंपिक अ‍ॅवार्ड विजेते यशस्वी उद्योजक डॉ. भावेश भाटिया (Paralympic Award winning successful entrepreneur Dr. Bhavesh Bhatia) यांनी व्यक्त केले.

धी शेंदुर्णी सेकं. एज्यू . सोसा. लि आणि आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै.आचार्य बापूसाहेब बापूसाहेब गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाला वर्ष १३ चे दुसरे पुष्प १५० पॅरा ऑलंपिक अॅवार्ड विजेते महाबळेश्वर येथील यशस्वी उद्योजक डॉ भावेश भाटिया यांनी ' रुक जाना नही ' या विषयावर गुफले.

कोरोना के इस अंधेरे मेI आशा की किरणे कायम रहे बिमारी कोई भी हो ...

शरीरकी तकलीफो को मन और दिमाग पर मत लेना बिखरने का इतिहास रखनेसे ज्यादा निखरने का इतिहास रचना चाहिए । हमने कंधो पर जनाजे निकलते देखा है कौन कहता है किसीका कंधा चाहिए ।

दोन विषयात एम . ए . केले .सायकॉलॉजी , अर्थशास्त्त्र च्या दुसऱ्या वर्षाला असतांना त्यांच्या आईला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले आणि त्या काळात आईच्या उपचारासाठी शेती व मालमत्ता त्यांची विकावी लागली . फक्त ५००० रु.मेणबत्ती उद्योगासाठी त्यांना लागणार होते ते कष्टातून कमावून छोट्या खोलीत त्यांनी मेणबत्ती उद्योगाला सुरुवात केली.

दिल शरीर के लेफ्ट मे हो ।

पर वो हमेशा राईट ढूंडता है ॥ असे सांगत मेंदूपेक्षा हृदयाचे ऐकावे असे त्यांनी सांगितले . उद्योजकते साठी झपाटून कार्य कसे करावे याबाबत त्यांनी अनमोल मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वक्ते डॉ भावेश भाटिया , धी शेंदुर्णी सेकं . एज्यू सोसा. चे अध्यक्ष संजय भा गरुड , सचिव सतिष चंद्र काशिद , राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे तज्ञ संचालक उत्तमराव थोरात, धी शेंदुर्णी एज्यू . संस्थेचे संचालक सागरमल जी जैन, उज्वलाताई काशिद , सागरमलजी जैन आचार्य गरुड प्रतिष्ठान चे अध्यक्ष कैलास देशमुख,देवश्री काशिद शेंदुर्णी एज्यु सोसा चे संचालक अभिजित काशिद रा दे निकम सर , यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले . प्रास्ताविकातून उत्तमराव थोरात यांनी वक्ता कसा समाजाच्या जडणघडणीत महत्वाचा ठरतो याची महती विषद करत वक्ता दस सहेश्रृ वंदीता ...दाता ... संस्कृत उक्तीचा संदर्भ स्पष्ट केला . स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त व्याख्यानमालेच्या विचार यज्ञाचा गौरव त्यांनी केला .

प्रमुख वक्त्यांचा परीचय करतांना यशस्वी खेडाळू , गिर्रारोहक ९५०० हून अधिक दृष्टहि न लोकां ना त्यांनी रोजगार दिला आहे थाळी फेक , गोळा फेक स्पर्धेचे ते विजेते आहेत . किली मांजरा हिल अफ्रिका नेपाळ येथील लेपा हिल माऊंट एवरेस्ट चढाईचा अॅडव्हान्स कोर्स त्यांनी केला आहे . तीनदा मानाचा राष्ट्पती पुरस्कार त्यांना मिळाला आहे महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग भूषण हा पुरस्कार भाटीया यांना प्राप्त आहे.कर्नाटक सरकार कडून मानद डॉक्टरेट त्यांना मिळाली आहे ,विविध राज्यांच्या दिव्यांग कल्याण फाऊंडेशन वर त्यांनी काम केले आहे .निता दिदी भाटिया यांच्या सह सपत्नीक उपस्थित होते .सूत्रसंचालन पी जी पाटील तर आभार डी बी पाटील, यांनी मानले गोविंद जी अग्रवाल ,यु .यु. पाटील तसेच पंचक्रोशितील व्याख्यानप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com