खंडेराव नगरात नवजात अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळले

रामानंदनगर पोलिसांकडून पाहणी ; गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
खंडेराव नगरात  नवजात अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळले

जळग‍ाव :- jalgaon

शहरातील खंडेरावनगर (Khanderavnagar) येथे शौचालयाचे बांधकाम (Construction of toilets) सुरू असलेल्या एका घरात शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन ते तीन दिवसांचे नवजात बालकाचे अर्भक (Newborn infant) कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात (Ramanandnagar police station) गुन्हा (Crime) दाखल करण्याचे काम सुरू आहे.

खंडेराव नगरात भाडेकरारावरील एका घरात शेख इरफान शेख पिंजारी हे राहतात. या घराचे पक्के बांधकाम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम सुरू असताना कामगारांनी पत्र लावण्याचे काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांनी पाहणी केली असता शौचालयाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या गोणीत नवजात बालक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. त्यामुळेच दुर्गंधी सुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकाराबाबत माहिती दिली. माहिती मिळाल्यावर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, सागर देवरे, नितेश बच्छाव, भूषण पाटील, अतुल चौधरी, संजय तडवी, रेवानंद साळुंखे यांनी घटनास्थळ गाठले. प्लास्टिकच्या गोणीत अंदाजे दोन ते तीन दिवसांचे अर्भक कुजलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी अर्भक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मध्यरात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी हे अर्भक ठेवले असल्याची माहिती मिळाली असुन याप्रकरणी रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू अाहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com