
पारोळा Parola प्रतिनिधी
येथील कजगाव रस्त्यावरील मेहु टेहू गावाजवळ मोटरसायकलला (motorcycle) अज्ञात ट्रकने (unknown truck) धडक (striking) दिल्याने त्यात मोटरसायकल वरील चालक (Motorcycle driver)जागीच ठार (Killed on the spot) झाला तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 15 रोजी सकाळी दहा वाजता घडली.
याबाबत तालुक्यातील आडगाव येथील भारत रामसिंग जाधव वय 21 हा व त्यासोबत दीपक चव्हाण वय 21 हे दोघे मोटरसायकलने जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांना धडक दिली त्यात भारत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपक चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक ऋषिकेश सूर्यवंशी,तुषार शेलार, दीपक पाटिल,नाजीम कुरेशी,आशुतोष शेलार,यांनी घटनास्थळी धाव घेत मयत व जखमी यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले. याबाबत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.