अनियमितता झालेल्या विभागांना महिनाभराचा अल्टीमेटम

पंचायत राज समितीची जिल्हा परिषद प्रशासनाला तंबी
अनियमितता झालेल्या विभागांना महिनाभराचा अल्टीमेटम

जळगाव jalgaon| प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) ग्रामपंचायत विभागात (Gram Panchayat) अनेक योजनांमध्ये अनियमितता आणि अपहाराच्या तक्रारी (Complaints of irregularities and embezzlement) आहेत. तसेच आरोग्य, सिंचन, शिक्षण यासह अनेक विभागाच्या योजनांमध्ये त्रुटी (Error) रेकॉर्डवर आलेल्या असून संबंधित विभागप्रमुखांना त्रुटी दुरुस्तीसाठी महिनाभराचा अल्टीमेटम (Ultimatum) दिला आहे. महिनाभरानंतर त्रुटींची पुर्तता न करणार्‍यांवर ही समिती (committee) कारवाईचा बडगा (Badga of action) उगारणार आहे.

राज्यातील पंचायत राज समितीचे प्रमुख ना. संजय रायमुलकर, आ. सुभाष धोटे, आ. कृष्णा गजबे, आ. आंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. किशोर दाराडे, आ. अनिल पाटील, आ. किशोर पाटील, आ. सदाशिव खोत, आ. महादेव जानकर, आ. रत्नाकर गुट्टे, आ. सुरेश धस, आ. किशोर जोरगेवार, आ. निरंजर डावखरे, आ. प्रदिप जैस्वाल, आ. डॉ. देवराज होळी यांच्यासह २१ आमदारांची समिती सोमवारी जिल्हा परिषदेत दाखल झाली. या समितीने सन २०१६-१७ च्या लेखा परिक्षण पुनर्विलोकन अहवाल संदर्भात संबंधित विभागाच्या आजी माजी अधिकार्‍यांकडून याबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या असल्या तरी याबाबत संबंधितांना पुर्तता करण्याची संधी या समितीने दिली आहे.

आमदारांची समिती करणार आज पाहणी

पंचायत राज समितीने सदस्यांच्या प्रत्येकी चार आमदांची अशी पाच समिती तयार केली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, अंगणवाड्या, आरोग्य विभागांना भेटी देवून त्याठिकाणावरील अडीअडचणी व त्रुटींविषयी माहिती घेवून त्याचा अहवाल सभागृहात सादर करणार आहे.

प्रामाणिकपणे काम करुन योजना राबवा

पंचायत राज समिती येणार असल्याने महिनाभरापासून विविध विभागांकडून काम केले जात होते. मात्र वर्षभर प्रत्येक कर्मचार्‍याने प्रामाणिपणे काम करण्याची मानसिकता ठेवून शासनाच्या विधि योजनांचा निधी खर्च करुन तो शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहचल्या पाहिजे. असे समितीचे अध्यक्ष ना. संजय रायमुलकर यांनी सांगितले.

राजकारण विरहीत काम करा

ज्य अधिकार्‍यांनी प्रामाणिपणे काम केले तर त्याची तक्रार होत नाही. प्रत्यकाने राजकारण विरहीत काम केले पाहिजे. संबंधित विभागांशी समन्वय साधून काम केल्यास अनेक योजनांना दिलेला निधी परत जाणार नसल्याचे ना. रायमुरकर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com