भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती

आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणारा आरोपी कृष्णा महादेव गोरे

भुसावळ : Bhusaval

भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला (minor girl) प्रेमसंबंध (Romance) निर्माण करीत फूस लावून पळवून (fleeing by seduction) नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार आरोपीच्या (accused) जळगाव गुन्हे शाखेने (Jalgaon Crime Branch) मुसक्या आवळल्या आहेत. कृष्णा महादेव गोरे (Krishna Mahadev Gore) (24, के.एम.पार्क, स्वामी समर्थ शाळेच्यामागे, गुरूदत्त कॉलनी, कुसुंबे, ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, पीडीता अत्याचारातून सहा महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे तर आरोपीने यापूर्वीदेखील एका 17 वर्षीय युवतीला फुस लावून पळवून नेले होते व नंतर तरुणी सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी लग्न करून घरी सोडले होते. या प्रकरणी आरोपीविरोधात जिल्हापेठ पोलिसात दाखल करण्यात आला होता. यानंतर 9 नोव्हेंबर 2021 रोजी ही तरुणी मयत झाली होती.

आरोपीच्या अखेर आवळल्या मुसक्या

भुसावळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. तक्रारदारांनी मुलीचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या सहाय्याने कल्याण, जि.ठाणे येथे जावून आरोपीच्या भाडे तत्वावरील घरातून मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीसोबत पीडीतादेखील असल्याने तिला ताब्यात घेण्यात आले मात्र पीडीता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, योगीता पाचपांडे, चालक मुरलीधर बारी आदींच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com