वीज ग्राहकांच्या डोक्याला ताप ; व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय वीजबिल अपडेट करण्याचा संदेश

वीज ग्राहकांच्या डोक्याला ताप ; व्हॉट्सअ‍ॅपवर फिरतोय वीजबिल अपडेट करण्याचा संदेश

लालचंद अहिरे । जळगाव

मागील महिन्याचे वीज बिल भरले नसल्याने आपले वीज कनेक्शन कट करण्यात येईल, असा संदेश जळगाव शहरातील विविध भागात फिरत आहे. तसेच ग्राहकांनी फेब्रुवारी महिन्याचे वीज बिल भरुनही असा संदेश येत असल्याने ग्राहकांच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

विद्युत मंत्रालय चीप ऑफिसर देवेश जोशी या बनावट नावाने जळगाव शहरातील ग्राहकांना संदेश फिरत असून आपण मागील फेब्रुवारी महिन्याचे वीज बिल भरले नाही. आजच वीज बिल भरा;अन्यथा आपले वीज कनेक्शन कट करण्यात येईल. असा संदेश पाठवून वीज ग्राहकांमध्ये गोंधळ आणि संतापाचा उद्रेक वाढत आहे.

वीज कनेक्शन कट करण्याविषयी एमईसीबीकडून असा कुठल्याही प्रकारे संदेश ग्राहकांना पाठवित नाही. हा फेक संदेश असून ग्राहकांनी अशा संदेशावर विश्वास ठेवू नये. ग्राहकांनी सतर्क रहावे.

श्री.खांडेकर, शाखा अभियंता, जळगाव

तसेच वीज बिल अपडेट करण्यासाठी मोबाई नं.09398782975 या हेल्पलाईनवर संपर्क करा, असा संदेश ग्राहकांमध्ये फिरत आहे. वीज बिल भरुनही ग्राहकांना व्हॉटस्अ‍ॅपवर बनावट संदेश फिरत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात काही ग्राहकांनी जवळच्या विद्युत कार्यालयात संपर्क साधला असता, विद्युत विभागाकडून अशा प्रकारचा वीज कट करण्याचा कोणताही संदेश पाठवित नसल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com