कंकराज येथील मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

कंकराज येथील मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

पारोळा - parola

तालुक्यातील कंकराज येथे एका शेतमजुराने घराच्या छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली असल्याची घटना आज 31 रोजी घडली.

संजय यशवंत भिल (वय ३५) याने पारोळा (police) पोलिसात खबर दिली की माझा भाऊ अशोक यशवंत भिल (वय ३५) राहणार कंकराज ता.पारोळा त्याची पत्नी त्याला सोडून गेली असल्याने तो घरात एकटाच राहतो व शेतमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवत होता सकाळी सहा वाजेपर्यंत त्याचा दरवाजा बंद अवस्थेत होता म्हणून त्यास उठवण्यास गेलो असता घरातून कोणाचाही आवाज आला नाही, दरवाजाची कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला असता घराच्या छताला दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यास शेजाऱ्यांच्या मदतीने खाली उतरवले व ईश्वर ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com