अजिंठा विश्रामगृहातील अत्याचार प्रकरणी एका रुग्णालयात चौकशी

पोलीस अधीक्षकांची माहिती
अजिंठा विश्रामगृहातील अत्याचार प्रकरणी एका रुग्णालयात चौकशी
देशदूत न्यूज अपडेट

जळगाव jalgaon प्रतिनिधी

शहरातील अजिंठा विश्रामगृहात (Ajanta Rest House) अत्याचार प्रकरणात (case of atrocities) पोलिसांकडून चौकशी (Inquiry by police) सुरू झाली आहे. मंगळवारी शहरातील प्रतापनगर (Pratapnagar) येथील एका रुग्णालयात (In a hospital) जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची (CCTV footage) तपासणी (Investigation) केली. मात्र चौकशीत अद्यापपर्यंत कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही

अजिंठा विश्रामगृहातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याप्रकरणाची चौकशी करावी यासाठी राज्य महिला आयोगाने पोलीस विभागाला पत्र पाठवले आहे. या पत्राच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी मंगळवारी एका रुग्णालयात जाऊन घटनेसंदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तसेच या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. या ठिकाणच्या कर्मचार्‍यांकडूनही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अजिंठा विश्रामगृहातही कर्मचार्‍यांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापपर्यंत कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही.अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी बोलताना दिली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com