पारोळ्यात भरला बैलांचा छुपा बाजार; मार्केट यार्डवर मात्र कडकडीत बंद

पारोळ्यात भरला बैलांचा छुपा बाजार; मार्केट यार्डवर मात्र कडकडीत बंद

पारोळा parola । प्रतिनिधी-

जळगाव जिल्ह्यात सध्या धुमाकूळ घालणार्‍या लंपी स्कीन आजाराने (Lumpy skin disease) थैमान घातले असून यामुळे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत (Collector Dr. Abhijit Raut) यांनी पारोळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) असलेल्या बैल बाजाराला (bull market) पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात (keeping closed) आल्याचे आदेश केले होते, ते पाळले गेले परंतु पारोळा-अमळनेर (Parola-Amalner road) रस्त्यावरील महेश मॉल (Opposite Mahesh Mall) समोर असलेल्या रिकाम्या जागेत छुपा बैल बाजार (hidden bull market) भरवण्यात आला व त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस (Animals for sale) आणले गेली होती. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. म्हणून हा छुपा बाजार दलालांच्या (brokers) माध्यमातून भरविण्यात आला असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात होते.

मार्केट यार्डवर कडकडीत बंद

पारोळा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत रविवारी भरणारा गुरांचा बाजार काही काळापुरता बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासक जी एच पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते त्याप्रमाणेच रविवारी बैल बाजार 100टक्के बंद होता.

सध्या जनावरांमध्ये लंपी स्किन डिसीज या साथ रोग बाधीत जनावरे आढळून आल्याने तसेंच या रोगाचा जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी होणार्‍या वाहतुकीमुळे जिल्हात इतर ठिकाणी बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याअनुषंगाने जळगाव जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशानुसार पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती मुख्य मार्केट यार्डवरील गुरांचा आठवडे बाजार दि.11 पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश केले होते. म्हणून शेतकरी बंधूनीं आपले गुरे-ढोरे विक्रीस आणू नये असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक जी.एच.पाटील. सचिव रमेश चौधरी यांनी केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com