भुसावळात डोळ्यात मिरची पूड टाकून जीम ट्रेनरचा खून

पैश्याच्या वादातून घडली घटना : खुनाचे सत्र सुरुच; दोन संशयित ताब्यात
भुसावळात डोळ्यात मिरची पूड टाकून जीम ट्रेनरचा खून

भुसावळ | Bhusawal

निखील राजपूत याच्या मर्डरनंतर काही दिवसांचा अवधी उलटत नाही तोच भुसावळात आज पुन्हा तरुणाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे. डोळ्यात मिरचीची पुड टाकुन या धष्टपुष्ट तरुणाची दोघांनी चाकुने भोसकून खून केल्याची घटना सकाळी सहा वाजता विवेकानंद शाळेनजीक मनियार हॉलजवळ घडली. मयत नाजीर शेख नासिर

भुसावळ शहरात काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर काही दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा एकदा शहरात खून झाला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील खडकारोड परिसरात पूर्व पैशाचा व्यवहार व अन्यकारणाने नातेवाईकानेच नाजीर शेख नासिर (वय ३१) या तरुणाच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकुन नंतर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तत्काळ जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषित केले.

मयत नाजीर शेख नासिर याच्या आप्तांनी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काळीज पिळवटून टाकणारा शोक केला. दरम्यान, यासंदर्भात प्रतिनिधीने वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाजीर शेख नशीर यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. तर, याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसर हादरला असून तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

मयत नाजीर याचे स्वत:चे माहीर या नावाने फिटनेस सेंटर आहे. पैशाचा वाद व अन्य एकाकारणाने हा खून झाल्याचे बोलले जाते. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी भेट दिली असून दोन संशयीत ताब्यात घेतले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com