जळगाव jalgaon । प्रतिनिधी
दिप उत्सवाला (Deep festival begins) सुरवात झाली असून शनिवारी धनत्रयोदशीचा (Dhantrayodashi) मुहूर्तावर नागरिकांनी (Citizens) सोने-चांदी (buy gold and silver) खरेदीला प्रचंड गर्दी (crowd) केली होती. त्यामुळे सऱाफ दुकानांमध्ये चक्क पाय ठेवायला जागा नव्हती. सोने चांदीच्या दरात वाढ (rate hike) झालेली असतांना देखील मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याची माहिती सराफ व्यवसायिकांनी दिली.
प्रकाशपर्वाला सुरवात झाली असून शनिवार धनत्रयोदशी नागरिकांनी उत्साहात साजरी केली. सायंकाळी नागरिकांनी धनलक्ष्मी, सोने-चांदी आदी धनाची पारंपारिक पद्धतीने पुजा केली. तसेच सकाळ पासूनच सुवर्ण बाजारात धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने चांदी खरेदीसाठी नागरिकांची सराफ दुकानांमध्ये गर्दी केली होती. दोन-तिन दिवसांपासून सोन्याचे भाव 100 ते 200 रुपयापर्यंत वाढले होते. शनिवारी सोने 51 हजार 800 प्रतितोळे भाव झाल्याने एकाच दिवशी 1000 रुपयांनी सोन्याचे भाव वाढलेले होते. तर चांदी देखील 59 हजार रुपये किलोग्रॅम भाव असल्याने एकाच दिवसात चांदी तब्बल 3 हजार रुपयांनी महाग झाली होती.
रस्त्यांवर गर्दी
दिपावली निमित्त फटाके, कपडे, वाहन, सोने चांदी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांंची मोठी गर्दी झाल्याने मुख्य रस्ते अक्षरश: फुलले होते.
वाहतूकीचा बोजवारा
वाहतुक पोलिसांच्या नियोजनाअभावी शनिवारी शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला होता. त्यामुळे पायी चालणार्या नागरिकांना देखिल वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचे चित्र दिसून आले.
दिवाळीत सोने खरेदीला अधिक मागणी असते त्यानुसार भाव वाढण्याची शक्यता होती. त्यानुसार पाच दिवसापासून सोन्याच्या भाव वाढून शनिवारी सोन्याचा भावात 800 रुपयांची भाव वाढ होत 51 हजार रुपये प्रतितोळे असे झाले होते.
सुवर्ण बाजारपेठेत सोन्याचे भाव वधारले असतांना चांदीला देखील झळाळी दिसून आली. पाच दिवसात चांदीचे भाव तब्बल तीन हजार रुपयांनी वाढले असून 59 हजार रुपये किलोग्रॅम झाले होते.
सराफ दुकानांत खरेदीसाठी गर्दी
सुवर्ण बाजारात धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीसाठी भंगाळे गोल्ड, रतनलाल सी बाफना या दालनांमध्ये नागरिकांनी सकाळ पासून गर्दी केली होती.त्यामुळे सुवर्ण बाजार गर्दीने फुलला होता. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा नागरिकांनी जोपसली. सोन्याचे मंगळसूत्रासह कुंडल, विविध प्रकारच्या डिझाईनचे हार, अंगठी, ब्रासलेट यांना ग्राहकांची मोठी मागणी होती. तब्बल दोन वर्षानंतर सराफ बाजारात ग्राहकांनी मनसोक्त सोने खरेदी केल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.