जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या एकाला फायटर, लोखंडी रॉडने मारहाण

चाळीसगाव पोलिसात १० जणांवर गुन्हां दाखल
जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेलेल्या एकाला फायटर, लोखंडी रॉडने मारहाण


चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी -

चाळीसगाव शहरातील न्यु. राज ढाबा(हॉटेल) जवळ जेवणाचे पार्सल meal parcel घेण्यासाठी गेलेल्या एकाल फायटर, fighter लोखंडी रॉडने मारहाण beaten करुन, त्यंाच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील १५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना दि,९ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला Chalisgaon Police Station आठ ते दहा जणांविरोधात गुन्हां दाखल Crimes filed करण्यात आला आहे.

या सबविस्तर माहिती अशी की, राजु पुंडलिक कुमावत(४३) रा, प्रभागत गली घाट रोड, चाळीसगाव हे दि,९ रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जेवणाचे पार्सल घेण्यासाठी शहरलगत असलेल्या न्यु. राज ढाबा(हॉटेल) येथे गेले होते. तेथे कृष्णा गायकवाड, अमोल गायकवाड, अभ्या गोल्हार, भुप्या सोनवणे, सचिन गायकवाड, अमळनेरचा दाऊद देशमुख, रोहन भोसले, संजय गाधीनगरचा पावट्या व इतर दोन ते तीन अनोखळी इसम आधिच पार्टी करत बसलेले होते. त्यापैकी दोघे हे राजु पुंडलिक कुमावत यांच्या जवळ आले व विनाकारण गळ्यातील चैन व पेशांची मागणी करु लागले. कुमावत यांनी नकार दिला असता, त्याना शिवीगाळ करत, जमिनीवर पाडुन जबर मारहाण केली. तसेच दोघांनी हातातील फायटर व लोखंडी रॉडने मारुन दुखापत केली. तसेच गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची चैन व १५ हजार रुपये रोख बळजबरीने काढुन घेतले.

राजु कुमावत यांना सोडविण्यासाठी आलेल्या हॉटेल मालक व वेटर यांना सुध्दा दमबाजी केली, ‘ जर तुम्ही मध्ये पडले, तर तुमचे हॉटेल फोटुन टाकू ’ अशी धमकी त्यांनी दिली, त्यामुळे भितीपोटी राजू कुमावत याना कोणीही सोडविण्यासाठी आले नाही. परंतू पोलिसांच्या गाडीचा सायरनचा आवाज ऐकताच सर्वांनी पळ काढला. राजु कुमावत याना बेशुध्द अवस्थेत त्यांच्या भावाने रुग्णालयात दाखल केले. त्यांना शुध्द आल्यानतंर त्यांनी पोलिसात तक्रारी दिली, त्यावरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला कृष्णा गायकवाड, अमोल गायकवाड, अभ्या गोल्हार, भुप्या सोनवणे, सचिन गायकवाड, अमळनेरचा दाऊद देशमुख, रोहन भोसले, संजय गांधीनगरचा पावट्या व इतर दोन ते तीन अनोखळी इसम यांच्याविरोधात भादवी कलम ३९७, ४२७ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.दिपक बिरारी हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com