लोणवाडी येथे बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू.

लोणवाडी येथे बैलजोडी धुण्यासाठी  गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू.

येवती, Yevati ता.बोदवड

बोदवड तालुक्यातील लोणवाडी (Lonwadi) येथील विनोद वसंत चौधरी हा तरुण शेतकरी (farmer) पिंपळगाव देवी रस्त्यानजिक असलेल्या बोरलोन या ठिकाणी तलावामध्ये (lake) बैल जोडी धुण्यासाठी (wash a pair of bullocks) गेला असता पाण्यात बुडून (drowned) या तरुणाचा मृत्यू (death) झाल्याची घटना दि.२६ रोजी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की सर्वत्र आज पोळा सण साजरा करण्यात येत असल्याने सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बैलांना सजावट करण्याआधी बैलांची अंघोळ करण्याची पद्धत आहे. यासाठी लोणवाडी येथील तरुण शेतकरी विनोद वसंत चौधरी वय 42 हा शेतकरी पिंपळगाव रस्त्यावरील बोरलोन परिसरामध्ये असलेल्या तलावामध्ये बैलजोडी धुत असताना अचानक बैल बिथरल्याने बैल हा तलावातील पाण्यात शिरला. विनोद चौधरी यांच्या हातातील दोर न सुटल्याने विनोद हे ओढले जात तलाव मधील गाळामधे फसत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी विनोद चौधरी यांना तलावाच्या बाहेर काढत वाचवण्याचा प्रयत्न केला.

प्राथमिक उपचार करत जामठी येथील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र चौधरी यांचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

विनोद चौधरी यांच्या मृत्यू नंतर लोणवाडी गावावर ऐन पोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली आहे. दरम्यान मयत विनोद वसंत चौधरी यांच्या पश्चात पत्नी आई एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com