सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळून शेतकरी ठार

जळगाव खुर्द उड्डाणपुलावरील घटना; नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद
सिमेंटच्या ब्लॉकवर दुचाकी आदळून शेतकरी ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे (Widening of flyover) काम सुरु असल्याने रस्त्यामध्ये ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकवर (cement block) दुचाकी आदळल्याने (hitting the bike) दुचाकीस्वार (hitting the bike) शेतकरी विजय मुरलीधर पाटील (वय-65, रा. नशिराबाद) हे जागीच ठार (killed) झाल्याची घटना शनिवारी सकाळी 7 वाजता जळगाव खुर्द उड्डाणपुलावर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे विजय पाटील हे वास्तव्यास असून शेती करतात. शनिवारी सकाळी रावेर तालुक्यातील पिंपळगांव येथे खासगी कामासाठी जाण्यासाठी (एमएच 19-बीबी-6933) क्रमांकाच्या दुचाकीने निघाले होते. जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वेवरील उड्डाण पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु आहे.

वाहनचालकांना पुढे अपघाती जागा असल्याची कल्पना यावी म्हणून पुलावर सिमेंटचे मोठे ब्लॉक ठेवण्यात आले आहे. सकाळी 7 वाजेच्या सुमारास उड्डाणपूलावरून जात असताना विजय पाटील यांची दुचाकी सिमेंटच्या ब्लॉकवर जावून धडकली.

यात पाटील यांच्या डोक्याला दुखापत होवून रक्तस्त्राव झाल्यामुळेत्यांचा दुचाकीवर बसलेल्या अवस्थेतच मृत्यू झाला. पोलिसांनी विजय पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास देण्यात आला. पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली,जावई असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com