
यावल - Yaval
यावलहून (bhusaval) भुसावळकडे जाणाऱ्या (धावत्या) (s t bus) एस.टी.बसवर अचानक मोठे झाड कोसळले (accident). यात चालकासह अन्य प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये सुरेश पंढरीनाथ महाजन, यावल, इच्छाराम टिकाराम राजपुत, सांगवी खुर्द, पंडीत लक्ष्मण परणकर, यावल, शकुंतला विलास चौधरी, धानोरा, सुशिलाबाई किसन धनगर, मुक्ताईनगर, जोबरा रशिद खाटिक, अडावद, सुरेश पंढरिनाथ महाजन, पद्माबाई रमेश कोळी, मंगला रामदास चौधरी, कल्पना सतीष चौधरी, दिपक येवलु वानखेडे, निलम शैलेंद्र पाटील अशी नावे आहेत.
घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच यावल एस.टी.आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ व कर्मचारी यांनी धाव घेतली. जखमींवर ग्रामीण रूग्णालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व तालुका वैदयकीय अधिकारी मनिषा महाजन हे औषधोपचार करीत आहेत.