photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणावर असलेल्या फुले मार्केटमध्ये हॉकर्स (Hawkers) व मार्केटमधील गाळेधारकांमध्ये ( Phule market traders) वाद (dispute) नित्याचेच आहे. याबाबत आज हा वाद उफाळला असून हॉकर्सऩे एका गाळेधारकाला मारहाण केल्याने आज फुले मार्केट व्यवसायिकांनी दुकाने बंद करून आंदोलन पुकारले. मोर्चा काढत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हॉकर्स विरुध्द घोषणाबाजी देत आंदोलन केले. यावेळी उपायुक्त तसेच विरोधीपक्षनेते यांना निवेदन देण्यात आले.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

जळगाव शहरात हॉकर्सच्या अतिक्रमणाचा विषय अत्यंत जटील बनत चालला आहे. त्यात फुले मार्केटमधील फुटपाथवर हॉकर्सच्या अतिक्रमणामूळे ग्राहकांना चालणे देखील कठीण झाले होते. याबाबत अनेकदा मनपाकडून हॉकर्सचे अतिक्रमण काढण्यात आले. आणि पून्हा जैसे थे परिस्थीती या मार्केटमध्ये आहे. त्यामुळे दररोज हॉकर्स व गाळेधारक व्यवसायिकांमध्ये दररोज वाद होत आहे.

त्यातच फुले मार्केटमधील गाळेधारकाचे हॉकर्सशी वाद झाले. यात हॉकर्सने गाळेधारकाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुरूवारी सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केट मधील व्यवसायिक असोसिएशने एकत्र येत दुकाने बंद करत आंदोलन पुकारले. महापालिकेत आंदोलन करून हॉकर्सवर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे उपायुक्त प्रशांत चाटे, विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांना केली.

यावेळी उपायुक्तांनी फुले मार्केटमधील व्यवसायिकांना आश्वासन देत हॉकर्सवर लवकरच कारवाई केली जाईल असे सांगितले. तसेच फुले मार्केट असोसिएशनने आठ दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण केले जाणार असा इशारा यावेळी मनपा प्रशासनाला दिला आहे.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा...

महापौरांनी आयुक्तांना दिले आदेश

शहरातील रस्ते, मार्केटमधील अनधिकृत तसेच बेशिस्त पणे दुकाने लावणारे हॉकर्स बाबतचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्यानुसार लवकरता लवकर अनधिकृत व वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्‍या हॉकर्सवर कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांना महापौर जयश्री महाजन यांनी दिले आहे. अशी माहिती विरोधीपक्षऩेते सुनील महाजन यांनी व्यवसायिकांना दिली.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
जवळ बाळगला देशी कट्टा एलसीबीने ठोकल्या बेड्या

फुले मार्केट बंद मूळे गोंधळ

शहरातील मुख्य व्यापारी संकुलापैकी एक असलेले फुले मार्केटमध्ये आज सकाळी व्यापारी असोसिएशने दुकाने बंद ठेवून आंदोलन पुकारले. हॉकर्सच्या विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरल्याने फुले मार्केट समोरीप रस्त्यावर गोंधळ उडाल्याने शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचार्‍यांना गर्दीवर नियंत्रण करून रस्त्याच्या बाजूला करावे लागले. जिल्हाधिकारी, शहर पोलिसांना देखील व्यापार्‍यांनी हॉकर्सवर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. तसेच सायंकाळी चार वाजता फुले मार्केट बाहेर व्यापार्‍यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवत आंदोलन केले.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
सराईत गुन्हेगाराचा व्यापार्‍यासह तरूणावर प्राणघातक हल्ला

मनपाकडून अतिक्रमण कारवाई

सेंट्रल फुले व फुले मार्केटमधील व्यवसायिकांनी मार्केटमधील हॉकर्सच्या विरोधात आंदोलन दुपारी केले. मनपा उपायुक्त गणेश चाटे यांनी तत्काळ अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून फुले मार्केटमधील हॉकर्सचे अतिक्रम पोलिस बंदोबस्तात काढले. यावेळी हॉकर्सचे गाड्या, टेबल, लोखंडी पेट्या आदी साहित्य जप्त केले.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
विद्यापीठ विकास मंचचा अधिसभेवर झेंडा

आधी एकत्र..आता एकमेकांच्या विरोधात

फुले मार्केटमध्ये गाळ्यांच्या बाहेर आधी मार्केटमधील अनेक व्यवसायिक हॉकर्सकडून व्यवसाय करण्यासाठी महिन्याला पैसे घेवून व्यवसाय करू देत होते. अजून देखील हे प्रकार सुरू आहे. परंतू आता हॉकर्सची संख्या वाढल्याने व्यवसायिकांच्या व्यवसायांवर आता परिणाम पडू लागल्याने आता हॉकर्स-व्यवसायिक यांच्यात वाद निर्माण होवू लागले आहे. परंतू आता मार्केटमध्ये पैसे घेवून हॉकर्सला संरक्षण देणार्‍या टोळ्या कार्यरत झाल्या आहे. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असल्याचे माहिती समोर येत आहे.

photos # हॉकर्स- फुले मार्केट व्यवसायिकांमध्ये वाद उफाळला
अरेच्च्या ...नंदुरबार जि.प. त पात्रता नसलेल्या अधिकार्‍यांना पदभार ?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com