रस्त्यांच्या कामांचा आमदारांकडून श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न

शिवसेना उबाठा गटाच्या पत्रकार परिषदेत आरोप
रस्त्यांच्या कामांचा आमदारांकडून श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरातील कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्याचे काम (road work) सुरू असून ते अपूर्ण असतांनाच एकाच रात्रीत मंत्री, आमदार यांच्या नावाचे रस्त्यांच्या कामांचे फलक (Road Works Board) कसे लागले. त्यात मनपा हद्दीत हे काम असतांना त्यात प्रोटोकॉल नूसार महापौर, उपहापौर यांचे नाव असणे आवश्यक होते. परंतू मनपाची आगामी निवडणूक (municipal election) पाहता आमदारांसह (MLAs) त्यांचे नगरसेवक श्रेय (credit) घेण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे (Shiv Sena) गटनेते बंटी जोशी केला.

रस्त्यांच्या कामांचा आमदारांकडून श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न
VISUAL STORY : मानसी नाईक नंतर ही अभिनेत्री होणार पती पासून विभक्त

शहरातील विकास कामांच्या शहरात लावण्यात आलेल्या फलकांबाबत माहिती देण्यासंदर्भात मनपाच्या सोळाव्या मजल्यावर उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, शिवसेना उबाठा महानगरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना विरोधीपक्षनेते सुनील महाजन म्हणाले, की आम्ही विकास कामे मंजूर करण्यापासून ते विकास कामांच्या उदघाटन करण्यासाठी आम्ही भेदभाव केलेले नाही.

आमची नेहमी शहरातील सर्व रस्ते पूर्ण करण्यासाठीची आमची भूमीका होती. गटनेते बंटी जोशी म्हणाले, 100 कोटीचा निधीतून किती निधी मिळवीण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले हे आधी सांगावे. 38 कोटी 28 लाखाचा निधी होणारे हे रस्ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मंजूर झाले होते. त्यात मनपाने 30 टक्के निधी त्यांच्या हिश्यांचा दिल्यानंतर शासनाने 8 कोटी 38 लाख निधी हा दिला त्यातून हे रस्ते तयार केले जात आहे.

अपूर्ण रस्त्यांचे कामांचे फलक हे कसे काय लावले जाताय, सर्वांनीच यासाठी प्रयत्न केले आहे. महापौर, उपमहापौरांचे नाव फलावकर प्रोटोकॉलन नुसार घेणे आवश्यक होते. या फलकांची चौकशी करण्यासंदर्भात आम्ही आयुक्त तसेच संबंधीत रस्ते कामांच्या यंत्रणेकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com