ढोली येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

ढोली येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने केली आत्महत्या

पारोळा Parola प्रतिनिधी

तालुक्यातील ढोली (Dholi) येथे 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याने (farmer) राहत्या घरी स्लॅबच्या कडीला सुती दोरीने गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली.  

याबाबत रमेश बापू पाटील यांनी पारोळा पोलिसात खबर दिली की प्रवीण तुकाराम पाटील हे शेती करत असून  त्यांनी त्यांच्या राहते घरात स्लॅबच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जयवंत पाटील हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com