
रावेर|प्रतिनिधी raver
गुरांवर आलेल्या लंपी (Lumpy) या रोगाने थैमान घातले आहे. अनेक गुर लागण होऊन दगावली सुद्धा आहे. अशात सरकारकडून गुरांकरिता कंटेन्मेंट झोन (Containment Zone) करण्यात आले आहे. मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, लम्पि रोगाने ग्रस्त जनावर मोकाट फिरत असल्याने त्यांची लागण इतर गुराना होऊन ते सुपर स्प्रेडर (Super Spreader) ठरू पाहत आहे.
शिवाय या आजाराने ग्रस्त असलेले जनावर शहरात विविध भागात फिरत असल्याने, नागरिकांना आरोग्याची चिंता वाटत आहे. हा सगळा प्रकार घडत असतांना, पशुसंवर्धन विभाग व नगरपालिका प्रशासन मात्र झोपेत आहे. तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.