Photos # युवा संसदेतून सक्षम नेतृत्व उभे राहील

अभिरुप । मू.जे.महाविद्यालयातील युवा संसद कार्यशाळेत खा. उन्मेष पाटील यांचे मत
Photos # युवा संसदेतून सक्षम नेतृत्व उभे राहील

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विद्यार्थ्यांनो, (students) जास्तीत जास्त वाचन (Reading) करावे, परिस्थितीचे आकलन करावे, समाजाला समजून (Understanding society) घ्यावे, चांगले शिक्षण घ्यावे आणि त्याद्वारे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला (personality) आकार द्यावा. तुम्ही सुजाण बना, कार्यक्षम व्हा आणि संधी मिळेल तेव्हा आपल्या गावाचे, शहराचे, राज्याचे किंबहूना देशाचे नेतृत्व (leadership of the country) करा. युवा संसदेमधून (Youth Parliament) समाज आणि देशाचे कल्याण करणारे (Welfare of society and country) सक्षम नेतृत्व उभे राहू शकेल, असा आशावाद खा.उन्मेष पाटील (Mp. Umesh Patil ) यांनी व्यक्त केला.

मूळजी जेठा महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग आणि विद्यार्थी कल्याण विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यापीठस्तरीय युवा संसद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी ते बोलत होते. युवा संसद कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे मानव्यविद्या शाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, यांनी सहभागी विद्यार्थ्यांना सांगितले की, आपल्या भारतीय लोकशाहीने जगाला चांगल्या आणि टिकाऊ शासन व्यवस्थेचा वस्तुपाठ दिला आहे. संसदीय कार्यप्रणाली कशा पद्धतीने संचालित केली जाते याचा प्रत्यक्ष नमुना आज युवा संसद कार्यशाळेतील अभिरूप संसदेमधून आपणास पहावयास मिळणार आहे.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून सहभागी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्य आणि देशाचे हित जपण्याचा मोलाचा सल्ला दिला.

.

धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संतोष खत्री यांनी भारतीय लोकशाही, तिची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी यावर विविध दाखले दिलेत.अधिवेशनात राष्ट्र हितासाठीची जी ध्येयधोरणे ठरवली जातात ते सर्व या अधिवेशनांमध्ये तयार करण्यात येतात. या सर्व प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजेत,असेही त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण सत्रात राज्यशास्त्र विभागाचे डॉ.राजीव पवार यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय तुंटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले उपजत गुण त्यांना भविष्यात खूप पुढे घेऊन जातात आणि त्यांच्या करिअरला पूरक ठरतात,असे विचार त्यांनी सांगितले.

अभिरूप संसदेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट कार्य करणार्‍या संसदपटूंचा पुरस्कार देऊन गौरव देखील करण्यात आला. त्यामध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थी असे आहेत. उत्कृष्ट कार्य सभापती सानिका पाटील, मू.जे.महा., पंतप्रधान निर्भय सोनार, प्रताप कॉलेज, अमळनेर, विरोधी पक्ष नेता प्रेरणा चौधरी, प्रताप कॉलेज, अमळनेर, सत्ता पक्ष उत्कृष्ट मंत्री पुरुष विवेक पती, जी.एच.रायसोनी कॉलेज, जळगाव, सत्ता पक्ष उत्कृष्ट मंत्री महिला गायत्री माळी, एम.जे.कॉलेज, जळगाव, विरोधी पक्ष उत्कृष्ट मंत्री पुरुष अतुल उबाळे, मणियार विधी महाविद्यालय जळगाव आणि विरोधी पक्ष उत्कृष्ट मंत्री महिला प्राजक्ता राठोड, डॉ.जी.डी,बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव.

या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षण एम.जे.चे वरिष्ठ प्रा. प्रा.के.के.वळवी आणि एच.जे.थीम कॉलेजचे राज्यशास्त्राचे डॉ.वकार.शेख यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे होते. सोबत सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे, प्रा. संजय हिंगोणेकर, डॉ.चंद्रमणी लभाणे, डॉ.संतोष खत्री, डॉ. राजीव पवार हे उपस्थित होते. प्रास्ताविक संसद कार्यक्रमाचे संयोजक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.योगेश महाले व प्रा.किर्ती सोनावणे यांनी केले.

यशस्वीतेसाठी प्रा.विजय लोहार, डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.सागर बडगे, डॉ.अखिलेश शर्मा, डॉ. विलास धनवे, डॉ.एल.पी.वाघ, प्रा.दिलवरसिंग वसावे, प्रा.श्रद्धा जोशी, प्रा.भूषण धनगर, डॉ.ललिता निकम, डॉ.योगिनी राजपूत, डॉ.मनोज महाजन, प्रा.मोईन शेख यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला विविध महाविद्यालयातून 120 विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव

विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांना अशा कार्यशाळांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यामध्ये विविध प्रकारचे कौशल्य विकसित व्हावे, त्यांना राजकीय व्यवस्था आणि समाज व्यवस्थेची सुयोग्य समज निर्माण व्हावी, त्यांच्यामधून चांगले नेतृत्व मिळावे आणि त्यांच्या हातून समाजाची व देशाची सेवा घडावी, असे मत विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अभिरुप संसद प्रणालीचा विद्यार्थ्यांनी घेतला अनुभव

मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अभिरूप संसद तयार करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संसदीय कार्य प्रणालीचा अनुभव घेतला. ज्यामध्ये मू,जे.ची विद्यार्थिनी सानिका पाटील हीची सभापती पदावर निवड करण्यात आली. अमळनेर येथील निर्भय सोनार या विद्यार्थ्यांची पंतप्रधानपदी निवड झाली.

प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा चौधरी हिची विरोधी पक्ष नेता, बेंडाळे कॉलेज ची प्राजक्ता राठोड हीची उप सभापती, मणियार विधी महविद्यालयाचा रितिक कुमावत याची गृहमंत्री पदी, तर एम.जे.मधील राज तायडे याची संरक्षण मंत्रीपदी निवड करण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष शपथ सुद्धा घेतली. सहभागी सर्व संसदीय खासदारांनी (विद्यार्थ्यांनी) विविध प्रश्नोत्तरे आणि योजनांवर चर्चा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com