जुन्या वादातून सफाई कर्मचार्‍याला मारहाण

दोघांसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
जुन्या वादातून सफाई कर्मचार्‍याला मारहाण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जून्या भांडणाच्या (old quarrel) कारणावरुन महापालिकेतील (Municipal Corporation)सफाई कर्मचारी (Cleaning staff) असलेल्या तरुणाला (young man) लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (brutal beating) केल्याची घटना गुरुनानक नगरात घडली. याप्रकरणी दोन जणांसह अल्पवयीन मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गुरुनानक नगरात विशाल सुभाष पवार (वय-34) हा तरुण वास्तव्यास असून तो महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस आहे.विशाल याचा लहान भाऊ याच्यासोबत गुरुनानक नगरातीलच सागर गोयर याच्यासह त्याच्या भावंडांचे भांडण झाले होते.

विशाल पवार याने सोमवारी दुपारी 4 वाजता गुरुनानक नगरात रामदेवजी बाबा मंदिराजवळ सागर गोयर यास विचारणा केली, याचा राग आल्याने सागर गोयर, पियुष पंडीत गोयर, प्रथम पंडीत गोयर व एक अल्पवयीन अशा चार जणांनी शिवीगाळ करत विशाल यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान सागर गोयर व इतर दोघांनी लोखंडी रॉडने विशाल याच्या पाठीवर तसेच उजव्या हातावर मारहाण करत दुखापत केली, या घटनेत विशाल हा जखमी झाला आहे.

याप्रकरणी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जखमी विशाल याच्या तक्रारीवरुन सागर रमेश गोयर, पियुष पंडीत गोयर, प्रथम पंडीत गोयर व एक अल्पवयीन सर्व रा. गुरुनानक नगर या चार जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर हे करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com