केशवस्मृती प्रतिष्ठानच्या भुलाबाई महोत्सवात खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

महोत्सवात 31 संघांचा सहभाग, लहान गट, मोठ्या गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या भुलाबाई महोत्सवात खान्देश लोकसंस्कृतीचा जागर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित (Keshavsmriti Pratishthan) ललित कला संवर्धिनी (Connoisseur of fine arts) आयोजित यावर्षीचा भुलाबाई महोत्सव (Bhulabai Festival) शनिवारी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात उत्साहात साजरा झाला. खान्देशातील लोकसंस्कृतीमध्ये (culture of Khandesh) भुलाबाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. खान्देश लोकसंस्कृतीचा जागर करणार्‍या या महोत्सवाचे यंदा 20 वे वर्ष आहे.

या महोत्सवासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ अमृता मुंढे, मराठी चित्रपट सृष्टीतील सहकलाकार स्वप्ना लिंबेकर भट, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, ललित कला संवर्धिनीचे प्रमुख पीयूष रावल, भुलाबाई महोत्सव प्रमुख रेवती कुरंभट्टी, मनिषा खडके आदी उद़घाटनप्रसंगी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्या अमृता मुंढे यांनी भुलाबाई उत्सवाचे कौतुक करुन सहभाग घेऊन व सर्वांनी एकत्र येऊन लोकपरंपरा व संस्कृती जतन करावी, असा संदेश दिला. तसेच कला अंगी असेल तर कोणतीही व्यक्ती जीवनात अधिक आनंदी राहतो. नव्याने एका समृद्ध संस्कृतीची ओळख झाली असेही स्वप्ना लिंबेकर भट यांनी सांगितले. या कार्यक्रमात भुलाबाईची आरती अंजली हांडे यांनी म्हटली.

सूत्रसंचालन मीना जोशी, सोनाली जाधव, सानिका पंचभाई, वैदेही नाखरे, आनंदी याज्ञिक, वैष्णवी जोशी, शर्वा जोशी, पीयुषा जाधव या सदस्यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रम प्रमुख रेवती कुरंभट्टी यांनी तर आभार स्वाती फिरके यांनी मानले.

स्मृतिचिन्हकरिता सचिन चौघुले यांनी सहाय्य केले. बक्षिसांची घोषणा सानिका पंचभाई व वैदेही नाखरे यांनी केली. समारोपप्रसंगी डॉ .केतकी पाटील, निना अशोक कोळी व रेखा पाटील पिंक रिक्षा चालक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता प्रांजली रस्से यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.

यशस्वीतेसाठी भुलाबाई समितीतील प्रतिमा याज्ञिक, प्रीती झारे, मिना जोशी, राजश्री रावळ, रेवती कुरंभट्टी, रेखा पाटील, सुनिता पाटील, अलका सोनवणे, विद्या कलंत्री, चारुलता महाजन, संध्या पाटील, अपर्णा पाटील, अनिता वाणी, साधना दामले, वंदना पाटील, स्वाती महाजन, स्वाती फिरके, केशवसमृती प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी सागर येवले, नितीन नेमाडे आणि सदस्यांनी सहकार्य केले.

खुल्या गटात सर्वांनी भुलाबाईचे गीत व त्यावर नृत्य सादर केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिला व मुलींनी भुलाबाईच्या पारंपरिक लोकगीतांचा समावेश भुलाबाई महोत्सवात केला. मुली व महिलांनी या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद लुटला. यामध्ये 5 ते 10 वयोगटाचा एक गट तर 11 ते 16 वर्षे दुसरा गट होता.

यापुढील गट खुला गट असे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे परीक्षण कथ्थक विशारद तनया पाटील, दिपाली पाटील नेरी, आकाशवाणी वक्ता प्रिया देशपांडे, लक्ष्मी परांजपे, आरती चौधरी, मंजुषा राव यांनी केले .

स्पर्धेत प्रत्येक गटास प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे देण्यात आली. बक्षीसपात्र संघांच्या लहान गट ( 5 ते 10वर्ष ) प्रथम पारितोषिक अच्युतराव अत्रे गट, जळगाव, द्वितीय पारितोषिक विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम गट, जळगाव, मोठा गट प्रथम पारितोषिक ब. गो. शानभाग विद्यालय, व्दितीय पारितोषिक प . न. लुंकड कन्या शाळा, खुला गट प्रथम विजेते नेवे महिला मंडळ, व्दितीय विजेते प्रगती विद्या मंदिर यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com