शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करणार

शिंदे गटाचे समर्थक नीलेश पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांचा इशारा
शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करणार
देशदूत न्यूज अपडेट

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिवसेनेच्या (Shiv Sena) काही पदाधिकार्‍यांनी (some officials) आंदोलन (movement) करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य (wrong statement) केले आहे. या वक्तव्याविरोधात पोलीसांकडे गुन्हा (crime) दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिंदे गटाचे समर्थक (Supporters of the Shinde group ) नीलेश पाटील (Nilesh Patil) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरविकास मंत्री असतांना आणि आता राज्याचे मुख्यमंत्री असतांना एकनाथ शिंदे यांनी जळगावला कोट्यावधी रूपयांचा निधी दिला असून शिवसेना पदाधिकार्‍यांचा अभ्यास कमी असल्याची टीकाही नीलेश पाटील यांनी केली.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गाजर दाखवा आंदोलन केले होते. या आंदोलनाला शिंदे गटाचे समर्थक नीलेश पाटील, मनपा नगरसेवक नवनाथ दारकुंडे, मनोज चौधरी, सरीता नेरकर आणि शोभा चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिले आहे.

नीलेश पाटील यांनी सांगितले की, हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातच 100 कोटींच्या निधीवरील स्थगिती उठविण्यात आली, तसेच आताही मुख्यमंत्री असताना मनपाला 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

मात्र, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभुषण पाटील व महानगरप्रमुख शरद तायडे यांनी आधी अभ्यास करावा त्यानंतरच आंदोलन करावे अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौर्‍यात मुक्ताईनगरात एमआयडीसीची घोषणा केली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नियोजन समितीमधून 61 कोटींचा निधी दिला असून उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या प्रभागातील कामे झाली, तरीही आंदोलनात उपमहापौर पुढे होते असेही नीलेश पाटील यांनी सांगितले.

मनपात सत्ताधार्‍यांचा दबाव

महापालिकेत आम्ही प्रश्न विचारू नये म्हणून महासभाच घेतली जात नाही. तसेच अधिकार्‍यांवरही महापालिकेतील सत्ताधार्‍यांचा दबाव असल्याचा आरोप नगरसेवक मनोज चौधरी यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निधी मिळाला व त्यांना निधीचे श्रेय भेटेल म्हणून महापौरांकडून 58 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव महासभेत ठेवला जात नसल्याचा आरोप नवनाथ दारकुंडे यांनी केला.

मनपा विरोधी पक्षनेते आंदोलन का करीत नाही?

गाजर दाखवा आंदोलनात पुढे राहणारे मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे रस्त्याच्या प्रश्न आला की महापौरांना का पुढे करतात? रस्त्यासाठी ते आंदोलन का करीत नाही? असा सवालही नीलेश पाटील यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com