पितळाच्या भांड्यासह ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास

पितळाच्या भांड्यासह ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपरखेड (Pimperkhed) येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील तांबा पितळ काशाचे भांड्या सहित एकूण ५९ हजारांचा मुद्देमाल आशा वर्कर्सच्या (Asha Workers) घरातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस (police) ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पिंपरखेड येथील आशा वर्कर कल्पना संजय खैरे (वय ४५) या ड्युटीवर गेल्या असताना त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून सकाळी दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरातील पितळी तांबे आणि काशाची भांडी तसेच इलेक्ट्रिक मोटार आणि साड्या असा एकूण ५९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कल्पना खैरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली वरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कलम ४५४/३५७ /३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com