यावल । Yawal प्रतिनिधी
तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतीचे (Hingona Gram Panchayat) गहाळ झालेल्या प्रोसिडिंगबाबत येथील ग्रामसेवक प्रमोदकुमार सैंदाणे यांनी फैजपुर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून त्यात ग्रामपंचायतीचे शिपाई यांच्यावर संशय व्यक्त केला आहे.
हिंगोणा ग्रामपंचायतीचे (Hingona Gram panchayat) दि.22 रोजी मासिक सभा सकाळी दहा वाजता हिंगोना ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये घेण्यात आली होती त्यात ही सभा तहकूब झाल्यामुळे गोंधळ उडाला होता. काही सदस्यांनी तहकूब सभेच्या प्रोसिडिंगची झेरॉक्स मागितली त्यानुसार साक्षीदार लिपिक गिरीश सिताराम राणे यांच्या प्रोसिडिंग बुक दिली असता त्यांनी सदर प्रोसिडिंग बुक झेरॉक्स आणून दिली व ग्रामसेवक यांची सही घेतली त्याच्या प्रती 22 एप्रिल रोजी साडेबारा वाजता सांगवी येथे नंतर ग्रामसेवक निघून गेले परत 29 एप्रिल 22 रोजी सकाळी 10 वाजता बैठक घेण्यासाठी ग्रामसेवक प्रमोद कुमार देवराम सैंदाणे रा.चोपडा हे आले असता त्यांनी प्रोसिडिंग बुकची (Proceedings Book) मागणी केली.
प्रोसिडिंग बुक आणून दिली नाही त्यानंतर बैठक नवीन प्रोसिडिंग बुक तयार करून घेण्यात आली ग्रामपंचायत मध्ये नंतर शोधाशोध केली असता प्रोसिडिंग बुक (Proceedings Book) मिळून आले नाही. 12:08 मिनीट ते 12:18 या कालखंडात कॉलेजमधील शिपाई प्रकाश रामचंद्र ठोंबरे प्रोसिडिंग बुक झेरॉक्स कामी घेऊन गेलेला दिसून आला झेरॉक्स करून आल्यावर त्याच्या हातात झेरॉक्स दिसते परंतु प्रोसिडिंग बुक (Proceedings Book) दिसून आले नाही प्रोसिडिंग बुक (Proceedings Book) शिपाई प्रकाश रामचंद्र ठोंबरे यांनी ग्रामपंचायत येथे परत न आणता ते व प्रामाणिकपणे हेतूने कोठेतरी लपून ठेवले आहे.
याबाबत पोलीस स्टेशनला ग्रामसेवक प्रमोद कुमार देवराम सैंदाणे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस स्टेशनला दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात साक्षीदार म्हणून लिपिक गिरीश सिताराम राणे यांचे नाव स्पष्ट नमूद करण्यात आलेले असून सदर गुन्ह्याबाबत पोलीस स्टेशन कडून सदर गुन्हा माझे न्यायालयाकडे दाद मागून घ्यावा असे स्पष्ट नमूद करण्यात आल्याने आता ग्रामसेवक नेमके पुढील काय भूमिका बजावतात? याकडे लक्ष लागून आहे.
सत्यता समोर यावी- तायडे
ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक (Proceedings Book) म्हणजे हे काही खेळ नव्हे इतक्या महत्त्वाच्या कागदपत्रांची हेराफेरी होत असेल तर येथे कामकाज कसे चालेल? इतक्या दिवस प्रोसिडींग कुठे पडले आहे ?गहाळ करण्यामागील खरे कारण काय? या ठिकाणी फुटेज बसवण्यात आलेले आहे त्याचा आधार घेऊन नेमकं खरा आरोपी कोण व इतक्या दिवस प्रोसिडिंग (Proceedings) ग्रामपंचायतीमध्ये न येणे याबाबत ग्रामसेवक आल्यानंतर वाच्यता झाली मग येथील कर्मचारी काय काम करत होते याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व सत्यता समोर आणावी अशी मागणी हिंगोणा ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम तायडे यांनी केली आहे.