बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलगी रफूचक्कर

इन्स्टाग्रामवर झाले होेते आक्षेपार्ह फोटो अपलोड
बदनामीच्या भितीने अल्पवयीन मुलगी रफूचक्कर

जळगाव - jalgaon

इन्टाग्रामवर (Instagram) आक्षेपार्ह फोटो अपलोड झाल्यामुळे बदनामी होईल या भितीने शहरातील रामानंदनगर परिसरात एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरुन पलायन गेले आहे. याप्रकरणी सोमवारी रामानंदनगर (police) पेालिसात गुन्हा दाखल झाला आहे.

रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. अल्पवयीन मुलीचे तिच इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले. त्यामुळे बदनामी होईल या भितीने अल्पवयीन मुलगी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घरात कुणाला काहीएक न सांगता निघून गेली आहे. उशीरापर्यंत मुलगी घरी पुन्हा परत न आल्याने तिच्या आईने रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय सुध्दा मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.