
पिंपळगाव हरे., ता.पाचोरा (वार्ताहर) Pachora
पाचोरा (pachora) तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. दि.१९ जून रोजी रात्रीच्या सुमारास महिला घरात झोपलेली असताना तेथेच राहणारा संशयीत आरोपी परशुराम पवार याने विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सदर घटनेचा पिंपळगाव हरे. (police) पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्या महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी परशुराम मधुकर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजार करीत आहे.