गांजाची खरेदी-विक्री करतांना तिघे ताब्यात

13 किलो गांजासह 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
चोरी
चोरी

चोपडा । प्रतिनिधी chopada

मध्यप्रदेश (mp) राज्यातून गांजा आणून त्याची विक्री करतांना तिघांना (police) पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्याकडून 13 किलो गांजासह 70 हजारांचा ऐवज जप्तची कारवाई केली.

अंमली पदार्थांची तस्करी प्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची घटना शहरातील बस स्थानकाजवळ (Bus station) घडली. दरम्यान अटकेत असलेल्या तिघा संशयितांना आज गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पाच दिवसाची कस्टडी सुनावली आहे.

शहर पोलीस स्टेशन मधील गुप्तवार्ता शाखेचे कर्मचारी पो.ना.विलेश सोनवणे यांना विक्की विनोद झवर (वय-22)रा.गुजरवाडा भोकर ता.जि.जळगाव हा मध्यप्रदेश राज्यातून गांजा घेऊन चोपडा बसस्थानकावर आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी माहितीची शहानिशा करून बसस्थानक परिसरात सापळा रचला.

यावेळी गांजा घेऊन आलेला विक्की विनोद झवर याने त्याच्या ताब्यातील 13 किलो गांजा मनवेल माटीन म्हस्के (वय-33) रा.संजय गांधी नगर ओ.टी.सेक्शन रेल्वे स्टेशन जवळ उल्हासनगर 2 ठाणे, जितेंद्र रविद्र महाजन (वय- 30) रा.515/1029 सानेगुरुजी नगर स्टेशन रोड उल्हासनगर 4 ठाणे यांना विक्री करीत असतांना पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तिघांना दि.23 फेब्रुवारी रोजी रात्री 10 : 50 वाजता बसस्थानक आवारात एका टपरी जवळ रंगेहाथ पकडून अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com